T20 World Cup 2024 Ind Vs Pak Match Tickets  : टी20 विश्वचषकाला आता फक्त दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. दोन जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.  29 जूनपर्यंत क्रिकेटचा महासंग्राम सुरु राहणार आहे. यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच 20 संघ संघाचा सहभाग असेल. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विश्वचषकतात भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्ये 9 जून रोजी आमना-सामना होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या सामन्याची तिकटे लाखो-करोडोमध्ये (world cup match tickets) विकलं जातेय. चाहत्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे लक्ष असेल. राजकीय संबंधामुळे भारत आणि पाकिस्तान हे संघ फक्त आयसीसी स्पर्धेतच एकमेंकाविरोधात खेळतात. त्यामुळे या सामन्याची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 9 जून रोजी होणाऱ्या तिकिटांची किंमत लाखोंमध्ये असल्याचं समोर आलेय. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं तिकिट -


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 9 जून रोजी न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. मैदानाची निर्मिती पूर्ण झाली आहे. वानखेडे स्टेडियमइतकीच याची प्रेक्षक क्षमता आहे. या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट यूएस करेन्सीीनुसार 2500 डॉलर इतकी असल्याचं समोर आलेय. भारतीय रुपायत याची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. समजा, एकाच कुटुंबातील चार जण सामना पाहायला गेले तर त्यांना 10 हजार डॉलर रुपये मोजावे लागतील. म्हणजे, त्यांना तब्बल 8.4 लाख रुपयांचे तिकिटं खरेदी करावी लागतील. पाकिस्तानच्या व्यक्तीला एका तिकिटासाठी त्यांच्या करेन्सीमध्ये 7 लाख रुपये मोजावे लागतील. 


भारत-पाकिस्तान सामन्याचं सर्वात महागडे तिकिट किती रुपयांना ?


काही दिवसांपूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 9 तारखेच्या सामन्याचं सर्वात महागडे तिकिट 1.86 कोटी रुपये इतके आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे विश्वचषकाच्या सामन्यातील सर्वात महागडे तिकिट 57 लाख रुपये इतके होतं. म्हणजे, अमेरिकेत हे तिकिट तिप्पट महागडे आहे. 


टी -20 वर्ल्ड कपमधील भारताचे सामने 


टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. भारताशिवाय आयरलँड, अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे.  भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9  जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस विरुद्ध 12 जून आणि चौथी 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे. 


 आणखी वाचा :


Ind vs Pak : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान मॅच ज्या मैदानावर होणार तिथून मोठी अपडेट समोर, पाहा व्हिडीओ 


भारत-पाक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन आणली खेळपट्टी, जाणून घ्या काय आहे खास