मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challngers Bengaluru) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) पाच पराभव झाले आहेत. आयपीएलच्या 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. पहिल्याच मॅचमध्ये आरसीबीला चेन्नई सुपर किंग्जनं पराभूत केलं होतं. यानंतर आरसीबीनं केवळ पंजाब किंग्ज विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीला कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जाएंटस, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. काल झालेल्या मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये देखील आरसीबीला मुंबईनं 7 विकेटनी पराभूत केलं. आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरु असल्यानं त्यांचा प्ले ऑफमधील प्रवास अडचणीत आला आहे. आरसीबीच्या या निराशाजनक कामगिरीबद्दल टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे. आरसीबनी कॅप्टनं पदावरून फाफ डु प्लेसिसची हकालपट्टी करुन विराट कोहलीला (Virat Kohli) संधी दिल्यास किमान लढत तरी होईल, असं हरभजन सिंग म्हणाला आहे. 


हरभजन सिंग काय म्हणाला?


टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या हरभजन सिंगनं आरसीबी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यानं पराभव स्वीकारणाऱ्या आरसीबीचं कर्णधारपद फाफ डु प्लेसिसकडून काढून पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात यावं, असं हरभजन सिंगनं म्हटलं आहे. 


विराट कोहली संघाचा कर्णधार झाल्यास आरसीबी किमान लढत देऊ शकते. विराट कोहली त्याच्या संघातील खेळाडूंना लढण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. विराट कोहलीला कॅप्टन करा ही टीम पुन्हा लढेल आणि जिंकेल, असं हरभजन सिंगनं स्टार स्पोर्टसशी बोलताना म्हटलं आहे.


विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये  322 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. 


विराट कोहलीनं 2013 ते 2021 च्या काळात आरसीबीची कर्णधारपद भूषवलं होतं. 2012 च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीचा उपकर्णधार होता.  फाफ डु प्लेसिस जखमी झाल्यानंतर विराटकडे पुन्हा एकदा आरसीबीचं कर्णधारपद आलं होतं. 


विराच कोहलीनं आरसीबीचं नेतृत्त्व 143 मॅचमध्ये केलं होतं. यामध्ये आरसीबीनं  66 मॅचमध्ये विजय मिळवला होता. तर 70 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 2021 च्या आयपीएलनंतर विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं. फाफ डु प्लेसिसनं आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 32 मॅचमध्ये नेतृत्त्व केलं होतं. यामध्ये 15 मॅचमध्ये आरसीबीनं विजय मिळवला तर  17 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 


आरसीबीचा मुंबईकडून पराभव


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील पाचवा पराभव होता. आरसीबीला आतापर्यंत आयपीएलमध्ये  एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.


संबंधित बातम्या : 



Hardik Pandya: 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान; तोंडभरुन कौतुकही केलं



Suryakumar Yadav : आम्ही सर्वांनी एबी डीविलियर्सला पाहिलंय, सूर्यकुमार यादव त्यापेक्षा चांगला, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं वक्तव्य