मुंबई :मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात काल झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईनं दुसरा विजय मिळवला. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं पहिल्या तीन मॅचमध्ये मुंबईकडून खेळी शकला नव्हता. सूर्यकुमार यादवनं कमबॅक केल्यानंतर दुसऱ्याच मॅचमध्ये वादळी खेळी केली. सूर्यकूमार यादवनं  17 बॉलमध्ये अर्धशतक केलं. सूर्यकुमार यादवनं चार षटकार आणि पाच चौकारांद्वारे आरसीबीला बॅकफूटवर पाठवलं. सूर्यकुमार यादवच्या या खेळीसंदर्भात टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे. 


 हरभजन सिंगनं सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सूर्यकुमार यादवची तुलना हरभजन सिंगनं एबी डीविलियर्स सोबत केली आहे. सूर्युकमार यादव आणि एबी डीविलियर्स चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करु शकतात. एबी डिविलियर्सला मिस्टर 360 नावानं ओळखलं जायचं. आता सूर्यकुमार यादवला देखील मिस्टर 360 नावानं ओळखलं जातं. एबी डीविलियर्सचं अपडेट रुप म्हणजे सूर्यकुमार यादव आहे, असं वाटत असल्याचं हरभजन सिंग म्हणाला. तो स्टार स्पोर्टर्सवरील कार्यक्रमात बोलत होता.      


हरभजन सिंगनं एबी डीविलियर्ससोबत सूर्यकुमार यादवची तुलना करताना म्हटलं की, सूर्या जर चमकला तर त्याच्यापुढे कुणाचा निभाव लागू शकत नाही. आम्ही एबी डीविलियर्स एक अद्भूत खेळाडू आहे. हरभजन सिंगनं पुढे म्हटलं की तो एखाद्या फ्रँचायजीच्या  ऑक्शन टीमचा भाग असल्यास मी सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा खरेदी केलं असतं मात्र, असं कधीच होणार नाही, असं हरभजन सिंग म्हणाला. 


हरभजन सिंगनं स्टार स्पोर्टससोबत बोलताना म्हटलं की सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे डॉमिनेट करतो तसं इतरांना डॉमिनेट करताना पाहिलेलं नाही. तुम्ही त्या खेळाडूला बॉल कुठे टाकणार, मी सध्या क्रिकेट खेळत नाही,यामुळं खुश आहे, असं हरभजन सिंग म्हणाला. 


सूर्यकुमार यादवची एंट्री, मुंबई इंडियन्सचं कमबॅक 


मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या पाच पैकी तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव पहिल्या तीन मॅचमध्ये दुखापतीमुळं खेळू शकला नव्हता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं संघात कमबॅक केलं आणि मुंबईला पहिला विजय मिळाला. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमारनं 18 बॉलमध्ये 52  धावा केल्या आणि मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 


संबंधित बातम्या :


Hardik Pandya: 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान; तोंडभरुन कौतुकही केलं


LSG Vs DC Dream11 prediction: केएल राहुल की पृथ्वी शॉ?, आज कोण करु शकेल मालामाल; पाहा 11 जणांची परफेक्ट टीम