लखनौ : आज आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होत आहे. लखनौच्या एकाना मैदानात ही मॅच होत आहे. लखनौ सुपर जाएंटस आणि दिल्ली कॅपिटल्स आज विजय मिळवून गुणतालिकेतील स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील. लखनौचा कर्णधार के.एल. राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा बॅटिंग केलेल्या मॅचेस जिंकल्या आहेत. त्यामुळं के.एल. राहुलनं आज देखील टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  


लखनौ सुपर जाएंटस सध्या तीन विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौनं चार मॅच खेळल्या असून त्यांना एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौ सुपर जाएंटसनं पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं आहे. याशिवाय लखनौच्या ग्राऊंडवर गुजरातला देखील पराभावाचा सामना करावा लागला होता.  राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जाएंटसला पराभूत केलं होतं. लखनौ सुपर जाएंटस सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. 


दुसरकीडे दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. रिषभ पंतच्या टीमला 5 पैकी चार मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. रिषभ पंतच्या टीमनं चेन्नई सुपर किंग्जला 20 धावांनी पराभूत केलं होतं. पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला होता. 


लखनौ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. आजच्या मॅचमध्ये नेमकं विजय मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


रिषभ पंतचं कमबॅक पण दिल्ली विजयाच्या प्रतीक्षेत 


रिषभ पंतनं अपघातामध्ये झालेल्या दुखापतीनंतर कमबॅक केलं आहे. रिषभ पंतनं चांगली फलंदाजी केलेली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसचा प्रमुख गोलंदाज मयंक यादव जखमी आहे. त्यामुळं तो खेळताना दिसणार नाही. 


लखनौची टीम


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अरशद खान


दिल्लीची टीम


डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शे होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल,जॅक फ्रेजर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा  खलील अहमद  


संबंधित बातम्या :


Suryakumar Yadav : आम्ही सर्वांनी एबी डीविलियर्सला पाहिलंय, सूर्यकुमार यादव त्यापेक्षा चांगला, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं वक्तव्य


Hardik Pandya: 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान; तोंडभरुन कौतुकही केलं