Mumbai Indians नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदाच्या आयपीएलमधून (IPL) सर्वात पहिल्यांदा बाहेर पडणारा संघ ठरला. मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड यांच्यासारख्या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन संघात स्थान दिलं. मात्र, हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला (Tristan Stubbs) 20 लाखांमध्ये संघातून रिलीज केलं होतं. याच ट्रिस्टन स्टब्सवर दिल्ली कॅपिटल्सनं विश्वास दाखवला. दिल्ली कॅपिटलन्सनं खेळाडूंच्या लिलावात स्टब्सला 50 लाखांमध्ये संघात स्थान दिलं. दिल्ली कॅपिटल्सनं दाखवलेला विश्वास स्टब्सनं सार्थ ठरवला. ट्रस्टनं केलेल्या वादळी कामगिरीच्या जोरावर दिल्लीनं स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं.


मुंबईनं वगळलं, दिल्लीनं विश्वास टाकला


दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सनं वगळलेल्या स्टब्सला संधी दिली. स्टब्सनं देखील धडाकेबाज कामगिरी केली. काल झालेल्या लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये देखील स्टब्सनं अर्धशतक केलं आणि एक विकेट देखील घेतली. स्टब्सनं कालच्या मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 57 धावा केल्या. यामध्ये त्यानं तीन चौकार आणि चार षटकार मारले. 


दिल्ली कॅपिटल्सचे यंदाच्या आयपीएलच्या लीग स्टेजमधील सर्व सामने संपले आहेत. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ट्रिस्टन स्टब्सनं दिल्लीकडून 13 मॅच खेळल्या. यामध्ये त्यानं 54 च्या सरासरीनं आणि 190.90  स्ट्राइक रेटनं 378 धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टबसनं या आयपीएलमध्ये तीन अर्धशतक केली आहे.यामध्ये त्याची  नाबाद 71 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 




ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सनं 50 लाखांमध्ये खरेदी केलं होतं. त्यानं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. स्टब्सनं 3 विकेट देखील घेतल्या आहेत. स्टब्सनं 18 ते 20 ओव्हर दरम्यान 54 बॉल खेळले त्यात त्यानं 173 धावा केल्या आहेत. स्टब्स 13 मॅचमध्ये केवळ एकाच मॅचमध्ये बाद झाला होता. 


स्टब्सनं डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. स्टब्सनं 16 ते 20 ओव्हर्समध्ये 252 धावा काढल्या आहेत. 


दरम्यान,  दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात झालेल्या मॅचमध्ये ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 208 धावा केल्या. तर, लखनौ सुपर जाएंटसच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली होती. लखनौचा संघ 20 ओव्हर्समध्ये 9 विकेटवर 189 धावा करु शकला. निकोलस पूरन आणि अर्शद खान या दोघांच्या अर्धशतकामुळं लखनौ 189 धावांपर्यंत पोहोचलं. 


दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचलं असून लखनौ सुपर जाएंटस सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.


 संबंधित बातम्या :


IPL 2024 Rohit Sharma And Hardik Pandya: हार्दिक पांड्या येताच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्माचा काढता पाय; नक्की चाललंय काय?


IPL 2024: संत्र्याची तुलना सफरचंदाशी करु नको...; गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर संतापला, हार्दिक पांड्यासाठी मैदानात उतरला!