नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आयपीएलमधील 35 वी लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी चार वेळा पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. तर त्यांनी तीन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्सला दिल्लीनं पराभूत केल्यानं त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे. सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.हैदराबादनं चार मॅच जिंकल्या असून त्यांना दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.   


दिल्ली कॅपिटल्समध्ये कुणाला संधी?


रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्समध्ये आजच्या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेजर मॅक्गर्क, रिषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नॉर्खिया, खलील अहमद, मुकेश कुमार, एल. यादव या खेळाडूंचा समावेश प्लेईंग इलेव्हनमध्ये असेल.  






हैदराबादच्या टीममध्ये कुणाला संधी?


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ए. मार्क्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर) नितीशकुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, एम. मार्कंडे, टी. नटराजन यांचा समावेश आहे. 


 






दिल्ली विजयाची हॅट्रिक करणार?


दिल्ली कॅपिटल्सनं गेल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्सला दिल्लीनं पराभूत केलं आहे.  गुणतालिकेत दिल्ली सध्या सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीनं बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचा देखील पराभव केला होता. आज यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढणार आहे. रिषभ पंतनं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला असून आजच्या मॅचमध्ये दिल्लीच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नरचं कमबॅक झालं आहे. 


संबंधित बातम्या :


 IPL 2024 : ना रोहित ना विराट! आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगानं कोण पाडतंय धावांचा पाऊस? टॉपरचं नाव वाचून धक्का बसेल!   


IPL 2024 Rishabh Pant : मर्सिडीज, फोर्डसारख्या महागड्या गाड्या, दिल्लीत आलिशान घर; करोडपती ऋषभ पंतकडे संपत्ती किती?