CSK vs RR Live Score, IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी; 5 विकेट्सने मिळवला विजय

CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमने सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 12 May 2024 07:05 PM
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी

 राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळवला.

चेन्नईला विजयासाठी 12 धावांची गरज

चेन्नईला राजस्थानविरुद्ध विजयासाठी 17 चेंडूत 12 धावांची गरज आहे.

चेन्नईला दुसरा धक्का

चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. डॅरिल मिचेल 22 धावा करत बाद झाला.

चेन्नईला पहिला धक्का

चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर रचिन रवींद्र 27 धावा करत झेलबाद झाला.

चेन्नईला जिंकण्यासाठी 142 धावांचं लक्ष्य

राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे. 

राजस्थानला पाचवा धक्का

राजस्थानला पाचवा धक्का बसला आहे. राजस्थानचा फलंदाज शिवम दुबे शून्य धाव करत बाद झाला.

ध्रुव जुरेल माघारी

राजस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज ध्रुव जुरेलही बाद झाला आहे. सध्या राजस्थानची धावसंख्या 131/4 अशी आहे.

राजस्थानचा कर्णधार बाद

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन बाद झाला आहे. संजूने 15 धावा केल्या.

राजस्थानला दुसरा धक्का

राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. आक्रमक फलंदाज जॉस बटलर झेलबाद झाला आहे.

राजस्थानला पहिला धक्का

राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला आहे. यशस्वीने 24 धावा केल्या.

राजस्थानच्या 6 षटकांत 42 धावा

राजस्थानने 6 षटकांत 42 धावा केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सची Playing XI:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:

रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्षणा

एम ए चिदंबरम स्टेडियमवरचं रेकॉर्ड

एम ए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलच्या 82 मॅच झालेल्या आहेत. यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 48 तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 34 जागा जिंकल्या आहेत.  

चेन्नई आणि राजस्थान आमने सामने, कोण वरचढ? 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आतापर्ंयत 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये 15 मॅच चेन्नईनं जिंकल्या आहेत तर राजस्थान रॉयल्सनं 13 मॅच जिंकल्या आहेत. 

चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या ट्रॅकवर परतणार

चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सनं पराभूत केल्यानंतर त्यांच्या प्रयत्न विजयाच्या ट्रॅकवर परतण्याचा असेल. 

CSK vs RR : चेन्नईला विजय आवश्यक

चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. चेन्नईकडे सध्या 12 गुण आहेत.

RR vs CSK : राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर 

राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये 8 मॅच जिंकल्या असून 16 गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. 

पार्श्वभूमी

CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates  in Marathi: आज आयपीएलमध्ये दोन मॅच होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिली मॅच होणार आहे. ही आयपीएलमधील 61 वी मॅच असेल. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात दुसरी मॅच होईल.राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या तर चेन्नई चौथ्या स्थानावर आहे.  





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.