Latest Points Table IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 गडी राखून पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या 57 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि शेवटच्या षटकांत एमएस धोनीच्या 28 धावांच्या स्फोटक खेळीमुळे संघाने 176 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. लखनौचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी अर्धशतके झळकावली. डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. तर राहुलने 53 चेंडूत 82 धावा करत संघाच्या 8 गडी राखून विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. लखनौच्या चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. चार संघ 8, तर तीन संघाचे 6 गुण झाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत या सात संघांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.
गुणतालिकेची काय स्थिती?
आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या राजस्थानचा संघ अव्वल स्थानी आहे. राजस्थानचे 7 सामन्यात 6 विजयासह 12 गुण आहेत. कोलकाता 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून या संघाने 6 सामन्यात 4 विजय मिळवले आहे. लखनौविरुद्धच्या पराभवानंतरही चेन्नईचा संघ 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. चेन्नने 7 सामने खेळले असून यामध्ये 4 विजय आणि 3 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करायला लागला. तर 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर हैदराबादचा संघ आहे. हैदराबादने एकूण 6 सामने खेळले असून यात 4 सामन्यात विजय मिळवला आहे.
पाचव्या क्रमांकावर 8 गुणांसह लखनौचा संघ आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहे. तसेच दिल्लीचा संघ 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीने 7 सामन्यात 3 विजय मिळवले आहे. तर 4 सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आहे. मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 6 गुण आहेत. मुंबईने एकूण 7 सामने खेळले असून यात 3 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव झाला आहे. आठव्या क्रमांकावर 6 गुणांसह गुजरातचा संघ आहे. गुजरातने आतापर्यंत 7 सामने खेळले असून यामध्ये 3 सामन्यात विजय तर 4 सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करायला लागला आहे. पंजाबचा संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह तळाला म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुने 7 सामन्यात फक्त 1 विजय मिळवला आहे.
आज दिल्ली विरुद्ध हैदराबादचा सामना-
आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत दिल्ली सध्या सहाव्या क्रमांकावर असून हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?