IPL Hat Trick List: अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. वेंकटेश अय्यर याने विस्फोटक अर्धशतक झळकावत इम्पॅक्ट पाडला होता, त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय होय.. तर गुजरातचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय होय. गुजरातने दिलेले 205 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार राशिद खान याने हॅट्ट्रिक घेतली.  आंद्रे रसेल, नारायण आणि शार्दूल ठाकूर यांना राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या आयपीएलमधील ही पहिलीच हॅट्ट्रिक होय. याआधी आयपीएलमध्ये 21 हॅट्ट्रिकची नोंद आहे. राशिद खान याने आयपीएलमधील 22 वी हॅट्ट्रिक घेतली. 

फलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपला करिश्मा दिखवला आहे. आयपीएलच्या मागील 15 वर्षात 21 वेळा हॅट्ट्रिक झाली आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि युवराजसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.  आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक चेन्नईच्या लक्ष्मीपती बालाजीच्या नावावर आहे. बालाजीने पहिल्याच हंगामात पंजाबविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती. पहिल्या हंगामात तीन हॅट्ट्रिक  झाल्या होत्या. दुसऱ्या हंगामातही तीन हॅट्ट्रिकची नोंद आहे. विशेष म्हणजे, हॅट्ट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत रोहित शर्माचेही नाव आहे. रोहित शर्मानेही आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 वेळा भारतीय खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. तर सात वेळा विदेशी खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. अमित मिश्रा आणि युवराज यांनी एक पेक्षा जास्त वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूंना असा पराक्रम करता आलेला नाही.. पाहूयात आतापर्यंत आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणाऱ्या खेळाडूंची यादी.. 

IPL हंगाम गोलंदाज संघ बाद झालेले फलंदाज प्रतिस्पर्धी संघ
2008 लक्ष्मीपति बालाजी चेन्नई सुपर किंग्स इरफान पठान, पियूष चावला, व्हीआरव्ही सिंह किंग्स-11 पंजाब
2008 अमित मिश्रा दिल्ली डेयरडेविल्स रवी तेजा, प्रज्ञान ओझा, आर पी सिंह डेक्कन चार्जर्स
2008 मखाया नॅतिनी चेन्नई सुपर किंग्स सौरव गांगुली, देबब्रत दास, डेविड हुसैन कोलकाता नाइट रायडर्स
2009 युवराज सिंह किंग्स-11 पंजाब रॉबिन उथप्पा, जॅक्स कालिस, मार्क बाऊचर आरसीबी
2009 रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स हैदराबाद अभिषेक नायर, हरभजन सिंह, जेपी डुमिनी मुंबई इंडियन्स
2009 युवराज सिंह किंग्स-11 पंजाब हर्षल गिब्स, एंड्र्यू सायमंड्स, वेणुगोपाल राव डेक्कन चार्जर्स हैदराबाद
2010 प्रवीण कुमार आरसीबी डेमियन मार्टिन, एस नरवाल, पी डोगरा राजस्थान रॉयल्स
2011 अमित मिश्रा किंग्स-11 पंजाब आर मॅक्लाॉरेन, मंदीप सिंह, रेयॉन हॅरिस डेक्कन चार्जर्स हैदराबाद
2012 अजित चांडिला राजस्थान रॉयल्स जेस्सी रायडर, सौरव गांगुली, रॉबिन उथप्पा पुणे वॉरियर्स
2013 सुनील नरेन कोलकाता नाइट रायडर्स डेविड हुसै, अजहर महमूद, गुरुकिरत सिंह किंग्स-11 पंजाब
2013 अमित मिश्रा सनराइजर्स हैदराबाद भुवनेश्वर कुमार, आर शर्मा,  अशोक डिंडा पुणे वॉरियर्स
2014 प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्स मनिष पांडे, युसूफ पठान, टेन डोस्चेट कोलकाता नाइट रायडर्स
2014 शेन वॉटसन राजस्थान रॉयल्स शिखर धवन, हेनरिक्स, कर्ण शर्मा सनराइजर्स हैदराबाद
2016 अक्षर पटेल किंग्स-11 पंजाब दिनेश कार्तिक, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा गुजरात लायन्स
2017 सॅमुअल बद्री आरसीबी पार्थिव पटेल, मैक्लाघन, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स
2017 एॅड्र्यू टाय गुजरात लायंस अंकित शर्मा, मनोज तिवारी, शार्दुल ठाकुर रायजिंग पुणे सुपरजायंट्स
2017 जयदेव उनादकट राइजिंग पुणे सुपरजायंट्स बिपुल शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार सनराइजर्स हैदराबाद
2019 सॅम करन किंग्स-11 पंजाब हर्षल पटेल, कगिसो रबाडा, एस लामिछाने दिल्ली कॅपिटल्स
2019 श्रेयस गोपाल राजस्थान रॉयल्स विराट कोहली, एबी डिविलियर्स, मार्कस स्टोयनिस आरसीबी
2021 हर्षल पटेल आरसीबी हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चाहर मुंबई इंडियन्स
2022 युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स श्रेयस अय्यर, शिवम मावी, पैट कमिंस कोलकाता नाइट रायडर्स