IPL 2023, Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore : कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये लढत होणार आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने मुंबईचा आठ विकेटने पराभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. पण नवख्या नितीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरला पहिल्याच सामन्यात पंजाबकडून पराभवाचा धक्का बसला होता. कोलकाता घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले तर आरसीबी आपली विजय लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. ईडन गार्डनवर रंगणाऱ्या आजच्या सामन्यात कोलकात्याकडून सुनील नारायण महत्वाची भूमिका बजावू शकतो. सुनील नारायणच्या फिरकीपुढे विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा स्ट्राईक रेट खराब आहे. आरसीबीचे तिन्ही दिग्गज फलंदाजांना नारायणच्या फिरकीपुढे हतबल होतात.
नारायणपुढे आरसीबीचे त्रिकूट फेल -
विराट कोहली आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवातही कोहलीने दमदार केली आहे. मुंबईविरोधात धमाकेदार अर्धशतक झळकावलेय. यंदाच्या हंगामात विराट कोहली आयपीएलमधील सात हजार धावांचा पल्ला पार करु शकतो. पण विराट कोहलीची बॅट सुनील नारायणपुढे शांत असल्याचे आकडेवारीवरुन दिसेतय. नारायणच्या फिरकी गोलंदाजीसमोर विराट कोहलीचा स्ट्राइक रेट चांगला राहत नाही. विराट कोहलीने आयपीएलमध्ये नारायणच्या 98 चेंडूचा सामना केलाय. यामध्ये त्याला फक्त 101 धावा करता आल्यात. विराट कोहलीचा स्ट्राइक रेट फक्त 103.6 इतकाच राहतो. विराट कोहलीला नारायणच्या गोलंदाजीसमोर प्रत्येक चेंडूला फक्त एक धाव काढता आली आहे.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यालाही सुनील नारायणच्या गोलंदाजीसमोर धावा काढता येत नाही. फाफचा स्ट्राईक रेट तर 100 च्या खाली येतो. फाफ डु प्लेसिसला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जाते, पण त्याने सुनील नारायणच्या गोलंदाजीवर 45 चेंडूत फक्त 45 धावा चोपल्या आहेत. म्हणजे काय, तर नारायणच्या गोलंदाजीसमोर फाफचा स्ट्राईक रेट फक्त 80 इतका होतो.
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस प्रमाणे ग्लेन मॅक्सवेल याचा स्ट्राइक रेटही सर्वसाधारण राहिलाय. बिग शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलची बॅट नारायणच्या गोलंदाजीसमोर शांतच राहते. नारायणच्या 57 चेंडूवर मॅक्सवेल याला फक्त 58 धावा करता आल्या. मॅक्सवेल याचा स्विच हिटही नारायणपुढे फिका राहिलाय.
आणखी वाचा :
IPL 2023, Russell vs Kohli : ईडन गार्डन्सवर रसलचा मोठा विक्रम, आंद्रेचा झंझावात कोलकाताला तारणार की कोहली 'विराट' खेळी करणार?