Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabadआयपीएल (IPL 2023) चा दहावा सामना (IPL 2023 Match 10) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 7 एप्रिल रोजी, शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा उद्देश लखनौ संघाचा असेल. तर पहिला विजय मिळवून खातं उघडण्यासाठी हैदराबाद प्रयत्न करेल.


SRH vs LSG, IPL 2023 Match 10 :  हैदराबाद खातं उघडणार की लखनौला विजय मिळणार?


आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत एक सामना खेळला असून, त्यात त्यांचा चेन्नईकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.


Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?


लखनौ आणि हैदराबाद यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) होणार आहे. टी 20 च्या दृष्टीने येथील खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.


LSG vs SRH Probable Playing XI : हैदराबाद विरुद्ध लखनौ संभाव्य प्लेईंग 11


SRH Probable Playing XI : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11


मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी. एडन मार्कराम, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, फजलहक फारुकी


LSG Playing XI : लखनौ संभाव्य प्लेईंग 11


क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), काइल मायर्स, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पांड्या, निकोलस पूरन, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवी बिष्णो, मार्क वुड, आवेश खान


IPL 2023, LSG vs SRH : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


LSG vs SRH, Preview : हैदराबाद पहिला विजय मिळवणार? लखनौही विजयासाठी सज्ज; कुणाचं पारड जड?