Virat Kohli vs Naveen Ul Haq, Gautam Gambhir : आयपीएलमध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्याचा खरा हिरो ठरला विराट कोहली (Virat Kohli). कोहलीने या सामन्यात दमदार शतकं ठोकत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर गौतम गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्याशिवाय नवीन उल-हकवरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. आयपीएल 2023 मधील एक चर्चित विषय म्हणजे कोहली आणि गंभीर यांच्यातील वाद. आता पुन्हा एकदा कोहलीच्या चाहत्यांनी गंभीर आणि नवीनला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 


 कोहलीचं शतक गौतम गंभीरवर भारी! 


आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीच्या शतकानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि खेळाडू नवीन-उल-हक हे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे मीम्स ट्विटरवर शेअर करत आणि दोघांना ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर लखनौ (LSG) विरुद्ध आरसीबी (RCB) यांच्यात प्लेऑफचा सामना व्हावा, अशी आशाही अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.


विराटच्या चाहत्यांकडून नवीन उल-हकही ट्रोल


लखनौ आणि बंगळुरु दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. 1 मे रोजी आयपीएल सामन्यात कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. प्लेऑफचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे हे दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येतील की नाही हे सांगणं कठीण आहे. पण, विराटच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर #Viratkohli सोबतच #NaveenUlHaq #gambhir हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत. विराटच्या शतकानंतर अनेकांनी गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


कोहली आणि नवीन वादात गंभीरची उडी


आयपीएलचा यंदाचा हंगाम वादामुळेही चर्चेत आहे. बंगळुरु आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामन्यादरम्यान झालेला वाद सामन्यानंतर अधिक चिघळला. सामन्यानंतर हातमिळवणी करताना कोहली आणि नवीन यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. या वादात नंतर लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरनंही उडी घेतली होती. या वादाचे सोशल मीडियावर पडसाद दिसून आले. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचे चाहते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लखनौ संघाचा इतर संघासोबतच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांनी कोहलीच्या नावाची घोषणाबाजी करत गौतम गंभीरला  डिवचलं होतं. त्यानंतर नवीन उल हकचाही कोहलीच्या चाहत्यांनी समाचार घेतला.


पाहा व्हायरल मीम्स


















 


दरम्यान लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विराट कोहलीच्या दमदार खेळीचं कौतुक करण्यात आलं आहे. त्यावरही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 : विराट कोहलीनं रोहित शर्माचं टेन्शन वाढवलं! बंगळुरुच्या विजयामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? समीकरण जाणून घ्या