IPL 2023 Top Highlights : अटीतटीच्या लढतीत पंजाबने राजस्थनचा पाच धावांनी पराभव केला. शिखर धवन याने दमदार अर्धशतक झळकावले तर नॅथन एलिस याने चार विकेट घेतल्या. त्याशिवाय अर्शदीप यानेही भेदक मारा केला. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेसह ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या स्पर्धेतही मोठा बदल झाला. पाहूयात सविस्तर....


 ऋतुराजच्या डोक्यावर ऑरेंज कॅप, रेसमध्ये कोण कोण कोण


पहिल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक खेळी केली. दोन्ही सामन्यात ऋतुराजने अर्धशथके लगावली आहेत. पहिल्या सामन्यात ऋतुराजने ९२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर लखनौविरोधातही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज गायकवाड याने दोन सामन्यात १४९ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो. २०२१ मध्ये ऋतुराजने ऑऱेंज कॅप जिंकली होती. सध्या ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर आहे.  


दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा काइल मायर्स आहे.. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली होती. दोन सामन्यात मायर्स याने 126 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने झेप घेतली आहे. शिखर धवन याने दोन सामन्यात 126 धावा कोल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.  चौथ्या क्रमांकावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आहे. संजूने दोन सामन्यात 97 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने दोन सामन्यात 93 धावा केल्यात. सहाव्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे. तर सातव्या क्रमांकावर साई सुदर्शन आहे. आठव्या क्रमांकावर प्रभसिमरन सिंह आहे. नवव्या स्थानावर विराट कोहली आहे. कोहलीने एका सामन्यात 82 धावा केल्या आहेत. 


गोलंदाजीत मार्क वूडचा दबदबा कायम...
लखनौचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डोक्यावर सध्या पर्पल कॅप आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. राशिद खान, रवि बिश्नोई, नॅथन एलिस, युजवेंद्र चहल, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी पाच पाच विकेट घेतल्या आहेत. पण सरस धावगतीच्या आधारावर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रवि बिश्नोई तिसर्या, एलिस चौथ्या आणि चहल पाचव्या क्रमांकावर आहे. मोम्मद शामी सहाव्या स्थानावर आहे. अर्शदीप सातव्या स्थानावर आहे. 


आणखी वाचा :


IPL 2023: सुनील नारायणच्या फिरकीपुढे KGF फिके; कोहली असो की डु प्लेसिस, मॅक्सवेल, भल्याभले टाकतात नांगी