IPL 2023, Chennai Super Kings : धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघाचा सामना आज राजस्थानसोबत होणार आहे. आतपर्यंत आयपीएल सीएसकेने दमदार कामगिरी केली आहे. पण चेन्नईच्या आमदाराने सीएसके संघाला बॅन करा, अशी मागणी केली आहे. चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघ आहे. तरीही आमदाराने सीएसके संघ बॅन करण्याची मागणी केली आहे. त्या आमदाराची मागणीत तथ्य जाणवत आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे.
एसपी वेंकटेश्वरन यांनी चेन्नईवर बंदी घालण्याची मागणी केली. चेन्नईच्या संघात तामिळनाडू राज्यातील खेळाडूंचा समावेश नाही. चेन्नई संघ मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. पण राज्यातील खेळाडूच या संघात नाहीत. त्यामुळे या संघावर बंदी घायलायला हवी, अशी मागणी आमदार एसपी वेंकटेश्वरन यांनी केली आहे. एसपी वेंकटेश्वरन हे धर्मपुरी येथील आमदार आहेत.
एसपी वेंकटेश्वरन हे पट्टाली मक्कल काची (PMK) या पक्षाचे आमदार आहे. पीएमके या पक्षाने 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जांगावर यश मिळवले होते. त्यामध्ये एसपी वेंकटेश्वरन यांचाही समावेश आहे. एसपी वेंकटेश्वरन यांच्या मते, सीएसके तामिळनाडूमध्ये एक मोठा ब्रँड आहे. पण या संघात राज्यातील खेळाडूंचा समावेश खूप कमी आहे.
एसपी वेंकटेश्वरन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “ सीएसके संघ जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवंधीचा नफा कमवत आहेत. तसेच या संघाला तामिळनाडूचा संघ म्हणून सर्वांसमोर आणले जात आहे. पण या संघात तामिळानाडूचे किती खेळाडू आहेत. तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहे, त्यांना संघात स्थान मिळत नाही. जर स्थानिकांना याचा फायदा होत नसेल तर यावर बंदी घालण्यात यावी.”
चेन्नईचा विजय की राजस्थानची बाजी?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2023 गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून 5 विकेट्सने पराभवासह मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने लखनौ सुपर जायंट्सला 12 धावांनी पराभूत केले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत केलं. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर पंजाब किंग्सला 5 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर राजस्थानेन दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला.