IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हैदराबादकडून हॅरी ब्रूक, फारुकी, फिलिप्स आणि आदिल रशीद हे चार विदेशी खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. तर राजस्थानकडून जोस बटलर, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेन्ट बोल्ट हे चार विदेशी खेळाडू खेळत आहेत.
दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. राजस्थान संजू सॅमसनच्या तर हैदराबाद भूवनेश्वर कुमारच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. जेसन होल्डर आणि केएम आसिफ यांनी आज राजस्थानकडून पदार्पण केलेय. होल्डर गेल्या हंगामात लखनौ संघाचा भाग होता. यंदा तो राजस्थानकडून खेळणार आहे. राजस्थानचा संघ संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जोस बटलरवर (Jos Buttler) मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल, तर हैदराबादला मयंका अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. हैदराबाद संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले संतुलन आहे.
पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे.. कुणाला संधी मिळाली.. राखीव खेळाडू कोणते याबाबत जाणून घेऊयात....
Sunrisers Hyderabad XI, हैदराबाद संघाची प्लेईंग 11 -
अभिषेक शर्मा, मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार (कर्णधार) हॅरी ब्रूक, फारुकी, ग्लेन फिलिप्स (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक, टी नटराजन आणि आदिल रशीद
Rajasthan Royals XI, राजस्थान संघाची प्लेईंग 11 -
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकिपर), रियान पराग, आर, अश्विन, युजवेंद्र चहल, केएम आसिफ, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेन्ट बोल्ट
RR vs SRH Pitch Report : कशी आहे खेळपट्टी?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
IPL 2023: ‘ई साला कप नहीं!’आरसीबीचा कर्णधार भलतच बोलला अन् विराटला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल