IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. आज आरसीबी आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसकडून चुकून झालेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भर कार्यक्रमात फाफ डु प्लेसिस याच्याकडून आरसीबीचे स्लोगन चुकीच्या पद्धतीने उच्चारण्यात आले. ‘ई साला कप नहीं! असा उच्चार फाफ डु प्लेसिसकडून भर कार्यक्रमात झाला.. फाफच्या या उच्चारानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या विराट कोहलीलाही हसू आवरले नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आयपीएलच्या 15 वर्षाच्या इतिहासात आरसीबीला आतापर्यंत एकदाही चषक उंचावता आला नाही. आरसीबीचा संघ अनेकदा प्लेऑफमध्ये पोहचलाय. पण त्यांना चषक उंचावता आलेला नाही. प्रत्येकवर्षी आरसीबीच्या चाहत्यांना चषकाची आशा असते, पण आरसीबीला आतापर्यंत कप जिंकता आला नाही. आरसीबीने आपले स्लोगन ‘ए साला कप नमदे’ असे केलेय. पण हेच स्लोगन उच्चाराताना कर्णधार फाफ डु प्लेसिस चुकला.. त्याऐवजी फाफ ‘ए साला कप नमदे’ असे म्हणाला.. फाफ डु प्लेसिसच्या या वक्तव्यानंतर विराट कोहलीलाही हसू आवरले नाही. पण विराट कोहलीने नंतर फाफला स्लोगन व्यवस्थित समजावून सांगितले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतर संघाचे चाहते आरसीबीची खिल्ली उडवत आहे. हा व्हिडीओ अल्पवधीतच व्हायरल झालाय.
कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथे डु प्लेसिसला आगामी हंगामासाठी संघाच्या लक्ष्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, डु प्लेसिसने आरसीबीच्या स्लोगनचा चुकीचा उच्चार केला करण्यात आला. ‘ई साला कप नामदे’ म्हणजे ‘यंदा कप आमचा आहे’. डू प्लेसिसने ई साला कप नमदे म्हणण्याऐवजी ‘ई साला कप नहीं’ म्हटले. यानंतर विराट कोहलीलाही हसू आवरता आले नाही. विराट कोहलीने नंतर फाफला त्याची चूक लक्षात आणून दिली. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. यावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी कशी ?
2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफ मध्ये जागा मिळवली होती. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 14 सामन्यात 8 विजय मिळवले होते तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जाएंट्स संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. रविवारपासून आरसीबी आपल्या यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ करणार आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण यंदा केजीएफ आरसीबीला चषक उंचावून देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.