Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलच्या फिरकीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा चार विकेटने पराभव केला. राजस्थानने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. त्याशिवाय युजवेंद्र चहलसाठी हा सामना संस्मरणीय राहिला. हैदराबादविरोधात झालेल्या सामन्यात चहल याने टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. असा विक्रम करणारा चहल पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. हॅरी ब्रूक याला बाद करत चहल याने 300 विकेट घेण्याचा कारनामा केलाय.
टी 20 क्रिकेटमध्ये 300 घेणारा युजवेंद्र चहल 16 वेळा गोलंदाज ठरलाय. हा पराक्रम करणारा चहल आठवा फिरकीपटू ठरलाय. टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणारा चहल पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. आर. अश्विन 288 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पियुष चावला 276 विकेटसह तिसऱ्या क्रमाकंवर आहे.
टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज -
युझवेंद्र चहल - 303
आर अश्विन - 288
पियुष चावला - 276
अमित मिश्रा – 272
जसप्रीत बुमराह - 256
भुवनेश्वर कुमार - 256
हरभजन सिंग – 235
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू -
युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू झाला आहे. चहलच्या नावावर 170 विकेट झाल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अमित मिश्रा आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट डेवेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने 181 विकेट घेतल्या आहेत. तर 170 विकेटसह लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहल आणि मलिंगा संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या हंगामात चहलने 27 विकेट घेतल्या होत्या.
चहलने घेतल्या चार विकेट -
हैदराबादविरोधात युजवेंद्र चहल याने चार षटकात 17 धावंच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. चहलने हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, आदिल राशिद आणि भुवनेश्वर कुमार यांना तंबूत धाडले. आयपीएलमध्ये चहल याने आतापर्यंत पाच वेळा चार विकेट घेण्याचा कारनामा केलाय.
चहलच्या भेदक गोलंदाजीनंतर पत्नी धनश्रीने आनंद व्यक्त केला. राजस्थान रॉयल्स संघाने व्हिडीओ शेअर केलाय. पाहा व्हिडीओ
राजस्थानची विजयी सुरुवात -
राजस्थानने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव केला. संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीनंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यजुवेंद्र चहलने चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 131 धावांपर्यंत पोहचला. उमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्या फलंदाजीमुळे हैदराबदाच्या संघाने 100 धावसंख्या ओलांडली. अबुद्ल समद याने नाबाद 32 धावांची खेळी केली. तर उमरान मलिक याने 19 धावांचे योगदान दिले. समदचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 ची धावसंख्या ओलांडता आली नाही.