IPL 2023, SRH vs RR: जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 204 धावांची गरज आहे.


जोस बटलरचे झंझावत -


गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. यंदाही पहिल्याच सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. जोस बटलर याने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. बटलरपुढे हैदराबादच्या गोलंदाजाची दयनीय अवस्था झाली होती. जोस बटलर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भुवनेश्वर कुमार, फारुकी, वॉशिंगटन सुंदर, नटराजन यांचा त्याने समाचार घेतला. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांची खेळी केली. फारुकीने अप्रितिम चेंडूवर जोस बटलरला त्रिफाळाचीत बाद केले. जोस बटलर याने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. बटलरने पावर प्लेच्या षटकाचा फायदा घेत धावांचा पाऊस पाडला. 


यशस्वी जायस्वाल- बटलरची आक्रमक सुरुवात, पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा


बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अवघ्या 5.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. यामध्ये जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांचे योगदान दिलेय. पहिल्या विकेटसाठी बटलर आणि जयस्वाल यांनी 85 धावांची भागिदारी केली.  जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फटकेबाजीपुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. या दोघांच्या विस्फोटक फंलदाजीमुळे राजस्थानने पहिल्या सहा षटकात 85 धावांचा डोंगर उभारला. पावरप्लेमधील ही राजस्थानची सर्वाधिक धावसंख्या आहे. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांच योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल याने 13 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. 


यशस्वीचे दमदार अर्धशतक - 
यशस्वी जयस्वाल याने दमदार अर्धशतक झळकावले. जयस्वाल याने 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. एका बाजूला जोस बटलर आणि संजू सॅमसन विस्फोटक फलंदाजी करत होते, तेव्हा दुसऱ्या बाजूला यशस्वीने संयमी फलंदाजी केली. यशस्वीने 54 धावांच्या खेळीमध्ये 9 चौकार लगावले. फारुकीने यशस्वीची खेळी संपुष्टात आणली. यशस्वीने जोस बटलरसोबत पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली. तर संजूसोबत दुसऱ्या विकेटला 40 चेंडूत 54 धावा जोडल्या. 


संजू सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी - 


जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यानंतर संजू सॅमसन यानेही अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसन याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन याने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. नटराजन याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन बाद झाला. अभिषेक शर्मा याने सिमारेषावर संजूचा अप्रतिम झेल घेतला. संजू सॅमसन याने 32 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. या खेळीदरम्यान संजू सॅमसन याने चार षठकार आणि तीन चौकार लगावले. 


हैदराबादकडून कुणाची गोलंदाजी सरस - 


भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक धावा खर्च केल्या. भुवनेश्वर कुमार याने तीन षटकात 36 धावा खर्च केल्या. नटराजन याने सर्वात कंजूष गोलंदाजी केली. नटराजन याने तीन षटकात 23 धावा खर्च केल्या. यादरम्यान नटराजन याने दोन विकेट घेतल्या. फारुकीने 4 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. उमरान मलिक यालाही एक विकेट मिळाली.