IPL 2023 Sunrisers Hyderabad vs Rajsthan Royals : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) मध्ये सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) राजस्थान रॉयल्सकडून (Rajsthan Royals) पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानने (RR) हैदराबादवर (SRH) दणदणीत विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर हैदराबाद संघाची सीईओ (SRH CEO) काव्या मारन (Kavya Maran ) पुन्हा चर्चेत आली आहे. 


हैदराबादच्या पराभवानंतर सीईओ काव्या मारन चर्चेत


सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन हिची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. काव्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. तिचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तर हैदराबादच्या पराभवानंतरच्या काही फोटोमध्ये काव्या मारन निराश दिसत आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारनचे फोटो कायमच व्हायरल होतात. याआधी दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सामन्यादरम्यान एका  प्रेक्षकानं तिला प्रपोज केलं होतं, त्यामुळेही तिचे फोटो व्हायरल झाले होते.






Who is Kavya Maran : कोण आहे काव्या मारन?


काव्या मारन तिच्या सौंदर्यामुळे अनेक वेळा चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. काव्या मारन ही सनरायझर्स फ्रँचायझीची सीईओ आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी आहे. कलानिधी मारन (Kalanithi Murasoli Maran) हे प्रसिद्ध सन ग्रुपचे (Sun Group) संस्थापक आहेत. कलानिधी हे विविध टीव्ही चॅनेल्स, एफएम रेडिओ स्टेशन, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचेही मालक आहेत. 






सोशल मीडियावर काव्याचा वेगळा चाहतावर्ग


काव्या मारन हिला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याने ती आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या जवळपास सर्व सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असते. ती आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देताना दिसून येते. काव्या मारनचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर तिचा वेगळा चाहतावर्गही आहे.