SRH vs LSG, IPL 2023 : सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाचा कर्णधार एडन मार्करम याने घरच्या मैदानावर नाणेफीकाचा कौल जिंकलाय. पाहुण्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. नियमीत कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाची धुरा कृणाल पांड्याच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी विजय अनिवार्य आहे.  लखनौ संघाने संघामध्ये दोन बदल केले आहेत.. तर हैदराबादच्या संघात एक बदल केलाय. 


कशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग 11?
LSG Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स 
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकुर, रवी बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक, आवेश खान


SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद 
अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी


हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघ एकूण दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड जड आहे. लखनौ संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबाद संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल 2023 मधील दहाव्या सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला.


पॉईंट टेबलची काय स्थिती? 
गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे.