PBKS vs DC Match Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या 59 व्या सामन्यात आज पंजाब (Punjab Kings) आणि दिल्ली (DC vs PBKs) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 13 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात पराभवानंतर आज मैदानात उतरतील. विशेष म्हणजे चेन्नई विरुद्धचा सामना हरल्यानंतर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिल्ली संघांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. मात्र, पंजाब संघासाठी ही अखेरची संधी असेल. त्यामुळे पंजाब संघाला आजचा सामना जिंकण फार महत्त्वाचं आहे.


प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली (Delhi Capitals) संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर गेल्यामुळे संघाकडे आता हरण्यासाठी काही शिल्लक नाही, पण पंजाबचा प्लेऑफपर्यंतचा मार्ग खडतर करण्याची संधी दिल्ली संघाकडे आहे. त्यामुळे दिल्ली पंजाबला पुरेपुर टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.


आयपीएल गुणतालिकेमध्ये पंजाब किंग्स संघ आठव्या स्थानावर आहे. संघाकडे दहा गुण आहेत. पंजाब संघाने आतापर्यंतच्या 11 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 11 पैकी फक्त चार सामने जिंकता आले असून सात सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.


DC vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण तीस सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघाची परिस्थिती समान आहे. दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघानी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्या दिल्ली आणि पंजाब या दोन संघांपैकी कोणता संघ वरचढ ठरणार हे पाहावं लागेल.


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 13 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


SRH vs LSG Match Preview : लखनौ विरुद्ध हैदराबाद, प्लेऑफमध्ये कुणाला संधी? हेड टू हेड आकडेवारी पाहा