Indian Premier League 2023 : आयपीएलच्या गेल्या हंगमात जोस बटलर याने ज्या ठिकाणावरुन फलंदाजी थांबवली होती, यंदाच्या हंगमात तिथूनच फलंदाजी सुरु केली आहे. जोस बटलर याने आतार्यंत चार डावात तीन अर्धशतके झळकावली आहेत. जोस बटलर याने चेन्नईविरोधात अर्धशतकी खेळी केली. बटलरचे हे आयपीएलमधील १८ वे अर्धशतक झळकावलेय. जोस बटलर सध्या तुफान फॉर्मात आहे. 


जोस बटलर याने गेल्या हंगमात  17 डाावात 57.53 च्या सरासरीने 863 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये चार शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. सध्याच्या हंगमाता जोस बटलर याने 51 च्या सरासरीने चार डावात तीन अर्धशतकाच्या मदतीने 204 धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगमात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये जोस बटलर आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये आहे. 


जोस बटलर याने यंदाच्या हंगामाची सुरुवात अर्धशतकाने केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने ५४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पंजाबविरोधात तो १९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दिल्लीविरधात बटलरने ५१ चेंडूत ७९ धावांची खेळी केली होती.  


आज जोस बटलरची सावध खेळी - 


सलामी फलंदाज जोस बटलर याने सावध फलंदाजी केली. यशस्वी जायस्वल बाद झाल्यानंतर जोस बटलर याने संयमी फलंदाजी केली. बटलर याने ५२ धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. जोस बटलर याने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. 


राजस्थानच्या विजयात बटलरचे मोठे योगदान -  
आतापर्यंत तीन सामन्यापैकी दोन सामन्यात बटलरने अर्धशतक झळकावले. या दोन्ही सामन्यात राजस्थानचा विजय झालाय. चेन्नईविरोधातही आज बटलरने अर्धशतक झळकावलेय. त्यासोबतच त्याने आयपीएलमध्ये तीन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सर्वात वेगवान तीन हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजामध्ये जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे.