Maharashtra players in IPL 2023 CSK Team : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. देशभरातील तरुण खेळाडूंना नवी संधी मिळण्यासाठी आयपीएल स्पर्धा आहे, असे अनेक दिग्गज वारंवार सांगत असतात. आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडू भारतीयांना मिळाले. आयपीएलमुळे अनेकांची कोट्यधींची कमाई झाली. आयपीएलचा अनुभव पाठीशी असल्यामुळे अनेकांनी टीम इंडियात एन्ट्री केली. याच आयपीएलमध्ये महाराष्ट्रातील जवळपास दोन डझन खेळाडू दहा संघामध्ये खेळतात. यामध्ये सर्वाधिक खेळाडू एमएस धोनीच्या चेन्नई संघात आहेत. होय... चेन्नईमध्ये तब्बल सात खेळाडू महाराष्ट्रातील आहेत. त्याशिवाय दिल्लीमध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे. मुंबई इंडियन्समध्ये फक्त चार महाराष्ट्रतील खेळाडूंचा समावेश आहे. मुंबई महाराष्ट्रातील संघ असून यामध्ये फक्त चार खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये चार खेळाडूमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. म्हणजेच.. महाराष्ट्रातील संघ असतानाही येथील स्थानिक खेळाडू संघात कमी दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. तामिळनाडूच्या एका आमदारानेही हाच मुद्दा उपस्थित करत चेन्नई संघाला बरखास्त करा, अशी मागणी केली होती. चेन्नई संघात स्थानिक खेळाडू नाही, असा त्यांचा आरोप होता. मुंबईमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. मुंबईमध्ये फक्त चार खेळाडू आहेत. चेन्नईमध्ये महाराष्ट्रातील सात खेळाडूंचा समावेश आहे. यातील एका खेळाडूने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.
चेन्नईकडून खेळणारे मराठमोळे खेळाडू कोणते ?
मकेश चौधरी Mukesh Choudhary
तुषार देशपांडे Tushar Deshpande
अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane
प्रशांत सोळंकी Prashant Solanki
राजवर्धन हंगारकेकर Rajvardhan Hangargekar
शिवम दुबे Shivam Dube
ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad
सात खेळाडूपैकी मुकेश चौधरी दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेला मुकला आहे. पण गेल्यावर्षी त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. यंदा चेन्नई संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कमीत कमी चार खेळाडू मराठी दिसत आहेत. यामध्ये सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे याचा समावेश आहे. राजवर्धन हंगारकेकर याने सुरुवातीच्या काही सामन्यात कमालीचे प्रदर्शन केले होते. राजवर्धन याने पदार्पणातच तीन विकेट घेतल्या होत्या. फक्त प्रशांत सोळंकी याला अद्याप प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्याशिवाय सर्व खेळाडूंनी चेन्नईकडून आयपीएल सामने खेळले आहेत.