Rishabh Pant in IPL : दिल्लीचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत मंगळवारी मैदानात येणार आहे. दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये उपस्थित राहणार आहे. 2022 मध्ये भीषण अपघात झाल्यामुळे ऋषभ पंत काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पुढील काही महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाही. पण दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये येणार आहे. गुजरातविरोधात होणाऱ्या सामन्यात दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये येणार आहे. DDCA चे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


दिल्लीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ऋषभ पंत गुजरातविरोधातील सामन्यात दिल्लीच्या सपोर्टसाठी मैदानात येणार आहे. दुखापतीनंतरही पंत संघाच्या सपोर्टसाठी येणार आहे. ऋषभ पंत दिल्लीचा स्टार खेळाडू आहे. दिल्लीचे सपोर्टर त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन करतील असे DDCA चे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितले.  


 









पहिल्या सामन्यात पंतसाठी दिल्लीने केली खास गोस्ट -
दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे.  पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. दिल्लीची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली.  आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सी डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाला द्यायचा असेल.. पंतसाठी दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.  


आणखी वाचा :
IPL : चेन्नई, गुजरात, दिल्ली अन् पंजाबची ताकद वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल 


IPL 2023 : केकेआरला मोठा झटका,  शाकिब अल हसन आयपीएलमधून 'आऊट'