Most Fours in IPL : विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली धावांचा पाऊस पाडत आहे. सहा सामन्यात विराट कोहलीने चार अर्धशतके झळकावले आहेत. आज पंजाबविरोधात विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पंजाबविरोधात नवा विक्रम केलाय. आयपीएलमध्ये विराट कोहलीने 600 चौकार लावण्याचा पराक्रम केलाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या पाच फलंदाजाबद्दल जाणून घेऊयात..


आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा पराक्रम शिखर धवन याने केला आहे. शिखर धवन याने 209 डावात 730 चौकार लगावले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याचा क्रमांक लागतो. वॉर्नर याने 167 डावात 608 चौकार लगावले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर  विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराट कोहली याने 221 डावात 603 चौकार लगावले आहेत. सर्वादइक चौकार लगावणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे तर सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा याने 227 डावात 535 चौकार लगावले आहेत. तर सुरेश रैना याने 200 डावात 506 चौकार मारलेत. 


विराट कोहलीची अर्धशतकी खेळी - 
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने आज अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील विराट कोहलीचे हे चौथे अर्धशतक होय. विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 137 धावांची सलामी दिली. विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत फाफ याला साथ दिली. विराट कोहलीने याने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा डावात चार अर्धशतके झळकावली आहेत. मुंबई, लखनौ, दिल्ली आणि पंजाब संघाविरोधात विराट कोहलीने अर्धशतके झळकावली आहेत. तर कोलकाताविरोधात 21 धावांची खेळी केली होती. चेन्नईविरोधात विराट कोहलीला फक्त सहा धावांचे योगदान देता आले.  






विराट-फाफची दमदार सलामी - 
कर्णधार विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आज पुन्हा एकदा दमदार सलामी दिली. दोघांनी 16 षटकात 137 धावांची सलामी दिली. 98 चेंडूत 137 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीचे योगदान 59 धावांचे होते. तर फाफचे योगदान 71 धावांचे... विराट आणि फाफ यांनी चांगल्या चेंडूला सन्मान दिला.. तर खराब चेंडूचा समाचार घेतला. 


आणखी वाचा :
आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा कोहलीच्या खांद्यावर, पंजाबने नाणेफेक जिंकली