RCB vs KKR Match Preview: आरसीबी आणि कोलकाता यांच्यात आज संध्याकाळी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. आरसीबी लागोपाठ तिसरा विजय मिळवणार की कोलकाता विजयाच्या पटरीवर परतणार.. याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेय. कोलकात्यासाठी यंदाचा हंगाम खराब राहिलाय. कोलकात्याला आतापर्यंत पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे. दुसरीकडे आरसीबीने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तिसऱ्या विजयासाठी आरसीबी मैदानात उतरणार आहे. अशामध्ये दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 मध्येही बदल होण्याची शक्यता आहे. आरसीबीच्या संघात जोश हेजलवूड खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  


कोलकातामध्ये लिटन दास परतणार ? 


चेन्नईविरोधात कोलकात्याने लिटन दासऐवजी डेविड विजाला संधी दिली होती. पण त्याने निराशाजनक कामगिरी केली. आजच्या सामन्यात कोलकाता लिटन दासला मैदानात उतरवू शकतो.  जेसन रॉय आणि लिटन दास पुन्हा एकदा सलामीला उतरू शकतात. चेन्नईविरोधात नारायणला सलामीला उतराले होते, पण हा डाव फेल गेला. त्यामुळे केकेआर आपली चूक सुधारू शकते. 


आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार ? 


आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबी प्लेईंग ११ मध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे. पण आरसीबी जोश हेलवूडला संधी देऊ शकते. सिराज आणि हेजलवूड आरसीबीच्या गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात. 


 संभावित प्लेइंग XI पाहूयात.. 


कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), एन जगदीशन, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती 



इम्पॅक्ट प्लेयर्स: मनदीप सिंह, सुयश शर्मा, वैभव अरोरा, अनुकूल रॉय


रॉयल चेंलेंजर्स बेंगलोर : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेशाई, विजय कुमार, जोश हेजलवूड, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज


इम्पैक्ट प्लेयर्स: अनुज रावत, आकाश दीप, हर्षल पटेल, कर्ण शर्मा



IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.