IPL 2023 Points Table : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा 55 धावांनी दारुण पराभव केला. मुंबईचा पराभव करत गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने सात सामन्यात पाच विजय मिळवत दहा गुणांची कमाई केली आहे. दहा गुणांसह गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ दहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातपेक्षा चेन्नईच्या संघाचा नेट रेनरेट सरस आहे. त्यामुळे समान गुण असतानाही चेन्नईचा संघ पहिल्याच स्थानावर आहे. चेन्नईने सात सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. 


राजस्थान-लखनौला फटका - 


मुंबईच्या पराभवाचा फटका राजस्थान आणि लखनौ संघाला बसला आहे. गुजरातच्या विजायानंतर राजस्थान आणि लखनौ संघाची घसरण झाली आहे. राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय. तर लखनौच्या संघ चौथ्या स्थानावर घसरलाय. राजस्थान आणि लखनौ संघाचे प्रत्येकी आठ आठ गुण आहेत. 


चार संघाचे प्रत्येकी 8-8 गुण - 
राजस्थान, लखनौ, आरसीबी, पंजाब या संघाचे प्रत्येकी आठ आठ गुण आहेत. पण सरस नेट रनरेटच्या आधारावर राजस्थान तिसऱ्या तर लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. फाफच्या नेतृत्वातील आरसीबी संघ पाचव्या क्रमांकावर आहे. शिखरचा पंजाब संघ सहाव्या क्रमांकावर आहे. 


तळाच्या चार संघाची काय स्थिती - 


मुंबई इंडियन्स सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघाने सात सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर कोलकाता संघ आठव्या क्रमांकावर असून त्यांचे चार गुण आहेत. हैदराबाद संघ नवव्या तर दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहेत. कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी चार चार गुण आहेत. या तिन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान अधीक खडतर झाले आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे.







आरसीबी-कोलकातामध्ये लढत -  
बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअवर आरसीबी आणि कोलकाता यांच्यामध्ये बुधवारी काटें की टक्कर होईल. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला विजय गरजेचा आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याशिवाय ईडन गार्डन्सच्या मैदानावरील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आरसीबी आपल्या घरच्या मैदानावर उतरेल.