IPL 2023 Points Table : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) संघाने पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धच्या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला. पंजाबने गुजरात संघासाठी 154 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलने शानदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात गुजरात संघाने 19.5 षटकांत लक्ष्य गाठलं आणि यंदाच्या मोसमातील तिसरा सामना जिंकला. पंजाब किंग्सवर विजय मिळवल्यानंतर गुजरात टायटन्सने पॉईंट्स टेबलवर उडी घेतली आहे. आता गुणतालिकेत गुजरात संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर कायम


गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघाकडे प्रत्येकी 6 गुण आहेत. पण नेट रनरेट पाहता राजस्थान संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. राजस्थानचा नेट रनरेट 1.588 आहे. त्यानंतर लखनौ संघ 1.048 नेट रनरेट आणि 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबवरील विजयानंतर गुजरात संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा नेट रनरेट 0.341 आहे. 


कोणता संघ, कोणत्या स्थानावर?


गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकारवर संघाकडे प्रत्येकी 2 गुण आहेत. पण नेट रनरेटमुळे त्याचं स्थान बदललं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाकडे प्रत्येकी दोन गुण आहे. मुंबई आठव्या आणि हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला अद्याप एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे संघाला गुणतालिकेत अद्याप खातंही उघडता आलेलं नाही.


ऑरेंज कॅप (Orange Cap)


ऑरेंज कॅपच्या शर्यतीत या सामन्यानंतरही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, शुभमन गिलने पंजाबविरुद्ध सामन्यात 67 धावांची खेळी केली, त्यानंतर तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 185 धावांसह पाचव्या क्रमांकावर आला. 



  • शिखर धवन : 233 धावा

  • डेव्हिड वॉर्नर : 209 धावा

  • जोस बटलर : 204 धावा

  • ऋतुराज गायकवाड : 197 धावा

  • शुभमन गिल : 185 धावा


पर्पल कॅप (Purple Cap)


पर्पल कॅपच्या शर्यतीत म्हणजे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्याकडे आता 4 सामन्यांत 10 विकेट्स आहेत. या यादीत गुजरातचा राशिद खान 9 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीतील टॉप 5 गोलंदाज पहा



  • युझवेंद्र चहल : 10 विकेट्स

  • राशिद खान : 9 विकेट्स

  • मार्क वुड : 9 विकेट्स

  • अल्झारी जोसेफ : 7 विकेट्स

  • अर्शदीप सिंह : 7 विकेट्स


महत्त्वाच्या इतर बातम्या :


KKR vs SRH Match Preview : कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढत, कुणाचा पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी