PBKS vs MI, 1 Innings Highlights: लियाम लिव्हिंगस्टोन याचे वादळी अर्धशतक आणि जितेश शर्मा याची दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 214 धावांपर्यंत मजल मारली. लिव्हिंगस्टोन याने 82 धावांची खेळी केली. तर जितेश शर्मा याने 49 धावांचे योगदान दिले. मुंबईला विजयासाठी 125 धावांचे आव्हान आहे.


नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाबचा संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरला. पण पंजाब किंग्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. प्रभसिमरन याला अरशद खान याने स्वस्तात तंबूत पाठवले. प्रभसिमरन याने सात चेंडूत एका चौकारासह नऊ धावांची केळी केली. पहिली विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी पंजाबचा डाव सावरला. शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण दोगांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. शिखर धवन याने 20 चजेंडूत पाच चौकारासह 30 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू शॉर्ट याने 26 चेंडूत 27 धावांची खेळी केली. या खेळीत मॅथ्यू शॉर्ट याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. 


दोन विकेट झटपट पडल्यानंतर पंजाबच्या धावसंख्येला ब्रेक लागतो की काय अशी अवस्था झाली होती. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर दोघांनीही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक झळकावले. जितेश शर्मा आणि लिव्हिंगस्टोन यांनी शतकी भागिदारी केली. या दोघांच्या वादळी फलंदाजीमुळेच पजंबाने 200 धावांचा पल्ला पार केला. चौथ्या विकेटसाठी लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा या जोडीने 53 चेंडूत 119 धावांची भागिदारी केली. यामध्ये जितेश शर्माचे 49 धावांचे योगदान होते. 


लियाम लिव्हिंगस्टोन याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 42 चेंडूत 82 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने जितेश शर्माच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. आर्चरला लिव्हिंगस्टोन याने लागोपाठ तीन षटकार मारत धावसंख्या वाढवली. लिव्हिंगस्टोन याला जितेश शर्मा याने चांगली साथ दिली. जितेश शर्मा याने 27 चेंडूत नाबाद 49 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. एका धावेवर जितेश शर्माचे अर्धशतक होऊ शकले नाही. 


मुंबईकडून पियूष चावला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 29 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अरशद खान याला एक विकेट मिळाली. यांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला अद्याप यश मिळाले नाही.