IPL 2023, Match 46, PBKS vs MI:  मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघ मोहालीत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पंजाबने साखळी फेरीतील पहिला सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. आज या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरेल. 


पंजाबने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे मुंबई संघाने आतापर्यंत आठ पैकी चार सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पंजाब संघामध्ये काही बदल करण्यात आले आहे. अथर्व तायडे आणि कगिसो रबाडा यांना प्लेईंग 11 च्या बाहेर बसवलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे. 


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11  - 


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अरशद खान. 


पंजाब किंग्स - 


प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, ऋषी धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.





MI vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे. 


Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे. या मैदानाची  खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला