Atharva Taide Half Century : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना 257 धावांचा डोंगर उभरला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन स्वस्तात माघारी परतले. पण महाराष्ट्राचा पठ्ठ्या लखनौच्या संघाला एकटाच नडला. अथर्व याने लखनौची गोलंदाजी फोडून काढत अर्धशतक झळकावले. पंजाबचे फलंदाज एकीकडे विकेट फेकत असताना अथर्व याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अथर्वच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबचा संघाने लढा दिला. अथर्वच्या वादळी फलंदाजीमुळेच पंजाबने लखनौला टक्कर दिली. रवि बिश्नोई याने अथर्वची खेळी संपुष्टात आणली.. पण तोपर्यंत अथर्व याने अर्धशतक झळकावले होते.
IPL 2023 Atharva Taide : आपला भाऊ एकटाच नडला
अथर्व तायडे याने वादळी फलंदाजी केली. शिखर धवन तंबूत परतल्यानंतर अथर्व मैदानात आला होता. 258 धावांचा पाठलाग करताना पंजाबला मोठा धक्का बसला होता.. अथर्व याने वादळी खेळी करत पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला. अथर्व तायडे याने 36 चेंडूत 66 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत अथर्व तायडे याने दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. अथर्व याने पंजाबकडून सर्वाधिक धावसंख्या उभारली.
Who is Atharva Taide : कोण आहे अथर्व तायडे?
अथर्व तायडे हा मूळचा अकोल्याचा आहे. अथर्वचे वडील अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर आई देवयानी या गृहिणी आहेत. तायडे हे कुटूंब अकोल्याच्या शास्त्री नगर परिसरात राहते. ना अत्याधुनिक सुविधा, ना राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राऊंड...तरीही अकोल्याच्या अथर्व तायडे यांने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी. डावखुरा फलंदाज अथर्व तायडे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वयाच्या आठव्या वर्षापासून अकोला क्रिकेट क्लबवर खेळणाऱ्या अथर्वने यापूर्वी 16, 19, 23 वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो 19 व 23 वर्षाखालील भारतीय संघाकडूनही खेळला आहे. विदर्भ रणजी विजेत्या संघाकडून इराणी टॉफीतही सहभागी झाला होता. त्याशिवय लँकेशायर संघामध्येही तो खेळलाय. पंजाब किंग्सने अथर्व तायडे याला 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते.
अथर्व तायडेची आतापर्यंतची कामगिरी
1) 2018-19 च्या हंगामात कुचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील संघात 320 धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
2) अथर्वच्या नेतृत्वात 2014 मध्ये 14 वर्षाखालील संघानं राजसिंग डूंगरपूर सिरीज जिंकली होती. या स्पर्धेत अथर्वने मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला होता.
3) 2017-18 मध्ये आशिया कप चषकमध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघात सहभाग.
4) 2017-18 मध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्यावर गेला होता. यात अथर्वनं सलग दोन शतकं लगावली होती.
5) कौंटी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाशी करारबद्ध आहे. या सिरीजमध्ये 16 सामन्यात 1100 धावा. 61 बळी घेतलेत.