Ambati Rayudu, IPL 2023 : चेन्नईच्या संघाने यंदा सन्मानजनक कामगिरी केली आहे. पण धोनीचा एक प्लॅन फेल गेल्याचे दिसत आहे. रायडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवण्याचा धोनीचा प्लॅन फसला आहे. आतापर्यंत रायडूला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. राजस्थानविरोधात सवई मानसिंह स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. २०३ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात चेन्नईकडून अंबातू रायडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मौदानात उतरला होता. पण रायडूला खातेही उघडता आले नाही. यासह रायडूच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. रायडू शून्यावर बाद होणारा चौथा इम्पॅक्ट खेळाडू ठरलाय. 


2023 आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पृथ्वी शॉ याचा रेकॉर्ड सर्वात खराब आहे. पृथ्वी दोन सामन्यात शून्यावर बाद झालाय. आरसीबी आणि राजस्थानविरोधात पृथ्वीला खातेही उघडता आले नाही. कोलकात्याचा अनुकूल रॉय याचाही या यादीत समावेश आहे. अनुकूल रॉय दिल्लीविरोधात शून्यावर बाद झाला. मुंबईचा नेहल वढेरा पंजाबविरोधात शून्यावर बाद झाला होता. या यादीत रायडूचीही नोंद झाली आहे. रायडूलाही इम्पॅक्ट प्लेअर असताना खाते उघडता आले नाही.


त्याशिवाय जेव्हा जेव्हा इम्पॅक्ट प्लेअर शून्यावर बाद झाला.. त्या संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पृथ्वी शॉ, नेहल वढेरा, अनुकूल रॉय आणि आता अंबाती रायडू इम्पॅक्ट प्लेअर असताना शून्यावर बाद झालेत. त्याशिवाय चेन्नईला पराभवाचाही सामना करावा लागलाय. 


रायडूची खराब कामगिरी, धोनीचा प्लॅन फसला - 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर हा नवा नियम लागू झाला. धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करणारा संघ इम्पॅक्ट प्लेअरचा फलंदाजाला उतरवतो.. तर गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजावा उतरवतो. धोनीने  धावांचा पाठलाग करताना रायडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले. पण धोनीचा प्लॅन फसला. कारण आतापर्यंत रायडूला दमदार फलंदाजी करता आली नाही. रायडूने आतापर्यंत आपल्या कामगिरीने प्रभावित केले नाही. 


अंबाती रायडूला आठ सामन्यात फक्त 83 धावांचे योगदान देता आलेय. रायडूची सरासरी फक्त 16 इतकी आहे. यंदा रायडूला एकही शतक अथवा अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 27 आहे. यंदा रायडूने चार षटकार आणि सात चौकार लगावले आहेत.