IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेटने विजय मिळवला. तर डबल हेडर सामन्यातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून चेन्नई सुपर किंग्सला चार विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासोबतच मुंबई आणि पंजाबने गुणतालिकेत उडी मारली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने 213 धावांचं आव्हान दिलं होतं. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईनं 19.3 षटकात 214 धावा करत सामना आपल्या खिशात घातला. राजस्थानवरील या विजयासह मुंबईने नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर मजल मारली आहे. तर चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर पंजाब संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.


पराभवानंतर राजस्थानला झटका


आयपीएल 2023 पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघ कायम आहे. गुजरात संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याचा संघ 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स असून संघाकडे 10 गुण आहेत. लखनौने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सचा दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सकडे 10 गुण आहेत. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर चेन्नई संघ आहे. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत तर, 4 सामने गमावले आहेत.


इतर संघांची परिस्थिती काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ पाचव्या स्थानावरून घसरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाबने चेन्नईवर विजय मिळवून पाचवं स्थान पटकावलं आहे. पंजाब संघाने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकल्यानंतर पंजाबकडे 10 गुण आहेत. आरसीबी संघ आठ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई संघ राजस्थानचा पराभव केल्यावर आता सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आठपैकी चार सामने जिंकले असून  संघाकडे आठ गुण आहेत. कोलकाता संघ आठव्या स्थानावर असून संघाकडे सहा गुण आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. यानंतर हैदराबाद संघ आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ दहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद संघाकडे सहा तर दिल्ली संघाकडे चार गुण आहेत.


IPL 2023 Points Table : आयपीएल गुणतालिकेत तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Success Story : क्रिकेटसाठी घर सोडले, पोटासाठी पाणीपुरी विकली अन् 'यशस्वी' झाला