Shubman Gill, IPL 2023 : शुभमन गिल याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने गुजरातकडून आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने 17 सामन्यात 60 च्या सरासरीने आणि 158 च्या स्ट्राईक रेटने 890 धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. शुभमन गिल याने ऑरेंज कॅप पटकावली आहेत. गिलच्या आजूबाजूलाही कोणताही खेळाडू नाही. 129 ही शुभमन गिल याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. शुभमन गिल याने एकाच हंगामात 890 धावा कुठल्या असल्या तरी विराट कोहलीचा विक्रम अबाधित आहे. 


विराट कोहलीचा विक्रम अबाधित - 


यंदा शुभमन गिल याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. पण एकाच हंगामात सर्वाधिक धावा कऱण्याचा विराट कोहलीचा विक्रम अबाधित आहे. विराट कोहली याने 2013 मध्ये चार शतकासह 973 धावा केल्या होत्या. हा विक्रम अबाधित राहिलाय. एकाच हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तिसऱ्या क्रमांकावर जोस बटलर असेल. बटलर याने गेल्यावर्षी धावांचा रतीब लावला होता. त्याने चार शतकांसह धावांचा पाऊस पाडला होता. 


विराट-विल्यमसनला टाके मागे -


विराट कोहलीचा एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कायम आहे. पण दुसरा मोठा विक्रम मोडीत निघालाय. एकाच आयपीएल हंगामात 30 पेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम शुभमन गिल याच्या नावावर झालाय. गिल याने यंदाच्या हंगामात 13 वेळा 30 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. याआधी हा विक्रम विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्या नावावर होता. विराट कोहली याने 2016 मध्ये 12 वेळा 30 पेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. 2018 मध्ये केन विल्यमसन याने 12 वेळा 30 पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. 










यंदाच्या हंगामात कुणाच्या किती धावा ?


शुभमन गिल 890 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे, त्याने 14 सामन्यात 730 धावा चोपल्या आहेत. 639 धावांसह तिसऱ्या क्रमांकावरही विराट कोहली आहे. यशस्वी जयस्वाल 625 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. फाफ डु् प्लेलिस, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांच्या संगाचे आव्हान संपले आहे. पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या डेवेन कॉनवे याने 625 धावा केल्या आहेत. शुभमन गिल याला मागे टाकणे कॉनवेलाही शक्य नाही..त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅप शुभमन याच्याच डोक्यावर असेल.