IPL Finals results in odd years : चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. धोनीने नाणेफेकीचा कौल तर जिंकला पण सामना जिंकणार का ? कारण, समोर आलेल्या आकेडावारीनुसार, गुजरातच्या विजयाची शक्यता जास्त दिसत आहे. आयपीएलच्या इतिहासातील विषम संख्याच्या वर्षात झालेल्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. आज गुजरात प्रथम फलंदाजी करत आहे, त्यामुळे धोनीच्या पराभवाची शक्यता जास्त आहे.
आतापर्यंत विषम संख्याच्या वर्षात झालेल्या सात आयपीएल फायनलमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा पराभव झाला आहे. 2009 ते 2021 या सात वर्षातील आकडेवारीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. 2009 ते 2021 मधली आकडेवारी पाहा...
IPL Finals results in odd years:
2009 - Chasing team lost.
2011 - Chasing teams lost.
2013 - Chasing team lost.
2015 - Chasing team lost.
2017 - Chasing team lost.
2019 - Chasing team lost.
2021 - Chasing team lost.
2023 - GT are batting first tonight.
हार्दिक प्रत्येक आयपीएल फायनल जिंकलाय, आज काय होणार?
हार्दिक पांड्या आतापर्यंत एकाही आयपीएल फायनलमध्ये पराभूत झालेला नाही. हार्दिक पांड्या आतापर्यंत आयपीएलच्या पाच फायनल खेळला आहे. या सर्व सामन्यात त्या संघाचा विजय झालाय. आज अहमदाबादमध्ये काय होणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
हार्दिक पांड्या आयपीएलच्या एकाही अंतिम सामन्यात हरलेला नाही. हार्दिक पांड्या खेळत असलेला प्रत्येक संघ फायनलमध्ये जिंकलाय. आता हार्दिक पांड्या सहाव्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या याने मुंबईच्या संघाकडून चार आयपीएल फायनल खेळलाय. 2015, 2017, 2019, आणि 2020 मध्ये हार्दिक पांड्या मुंबईकडून आयपीएल फायनलमध्ये खेळला आहे. 2022 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात संघाचा कर्णधार झाला. त्यावेळीही गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली अन् जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यातील हार्दिक पांड्याची ही आकडेवारी गुजरात आणि हार्दिकच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे. पण यावेळी हार्दिकपुढे कॅप्टन कूल एमएस धोनीचे आव्हान आहे.
स्टेडिअवर मोठी गर्दी
रविवारी IPLच्या अंतिम सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला ब्रेक लागला. सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण प्रेक्षकांचा प्रचंड हिरमोड झाला. मैदानात आलेल्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांनी परतीची तिकीट बूक केली होती.. काही जणांनी उघड्यावर रात्र काढली. बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर चाहत्यांची गर्दी झाली होती. रात्रभर चाहते स्टेशनवर झोपले. आता चाहते पुन्हा एकदा नव्या दमाने स्टेडिअमवर आपल्या आवडत्या खेळाडूला, संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमवर परतले आहेत. स्टेडिअवर मोठी गर्दी झाली आहे.