IPL Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (IPL 2023 Orange Cap) केएल राहुलने (KL Rahul) डेवॉन कॉनवेला (Devon Conway) मागे टाकलं आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यातील दमदार अर्धशतकी खेळीमुळे केएल राहुल ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) शर्यतीत म्हणजेच यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. 22 एप्रिलच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात केलेल्या 66 धावांच्या खेळीमुळे केएल राहुल सध्या आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. डु प्लेसिसने आतापर्यंत एकूण 343 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑरेंज कॅप डु प्लेसिसकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, त्याने 285 धावा केल्या आहेत. विराट कोहली ऑरेंज् कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये 279 धावा केल्या आहेत.

त्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) ऑरेंज कॅप शर्यतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या डेवॉन कॉनवे मागे टाकून त्याने हे स्थान गाठलं आहे. केएल राहुलने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये 265 धावा केल्या आहेत.

Another captain's knock in the #LSGvGT clash 🙌

It's @klrahul this time who reaches his FIFTY 👌👌@LucknowIPL cruising in the chase!

Follow the match ▶️ https://t.co/TtAH2CiXVI#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/4GZmaIGbWT

— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023

क्र.  टॉप 5 फलंदाज  धावा
1. फाफ डुप्लेसिस  343
2. डेव्हिड वॉर्नर 285
3. विराट कोहली 279
4. केएल राहुल  265
5. डेवॉन कॉनवे 258

IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप 

पंजाब किंग्सचा (PBKS) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आक्रमक गोलंदाजी करत मोहम्मद सिराजकडून (Mohammed Siraj) पर्पल कॅप (Purple Cap) हिसकावून घेतली आहे. तो सध्या पर्पल कॅपचा मानकरी आहे. अर्शदीप सिंह आता आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

क्र.  टॉप 5 गोलंदाज  विकेट
1. अर्शदीप सिंह  13
2. मोहम्मद सिराज 12
3. राशिद खान 11
4. मार्क वुड 11
5. युझवेंद्र चहल 11

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : पंजाब आणि गुजरातचा विजय, गुणतालिकेत बदल; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?