IPL 2023 Points Table : सध्या आयपीएलचा (Indian Premier League) सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या 31 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (MI) पंजाब किंग्सकडून (PBKS) पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी विजय मिळवला. यासोबतच पंजाब संघाने गुणतालिकेत (IPL Points Table) उडी मारली आहे. या विजयानंतर पंजाब संघ आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाब संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. पंजाब संघाकडे सध्या 8 गुण असून नेट रनरेट -0.162 आहे. तर पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. मुंबई संघाकडे सहा गुण आणि -0.254 नेट रनरेटसह आहे.


टॉप 4 मध्ये कोणते संघ?


आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 31 साखळी सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यांनंतर गुणतालिकेची सध्याची सर्व संघांची स्थिती पाहिली तर राजस्थन रॉयल्स संघ पहिल्य क्रमांकावर कायम आहे. राजस्थान संघाकडे 8 गुण आणि 1.043 नेट रनरेट आहे. 
राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 4 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. यानंतर, लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने आतापर्यंत सात सामने खेळून त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत आणि सध्या संघाचा नेट रेनरेट 0.547 आहे. महत्त्वाचं म्हणजे टॉप 5 संघांकडे प्रत्येकी 8-8 गुण आहेत.


टॉप 5 संघांमध्ये चेन्नईही सामील आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि संघाच नेट रनरेट 0.355 आहे. गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात संघाने आतापर्यंत 7 सानमेन खेळले असून त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत आणि संघाचा नेट रनरेट 0.212 आहे. पंजाब संघ आठ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.




इतर संघांची परिस्थिती काय?


सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आता मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. मुंबई संघाचा नेट रनरेट -0.254 आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स पॉइंट टेबलमध्ये अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबाद आणि कोलकाता संघाकडे प्रत्येकी 4-4 गुण आहेत, तर दिल्ली 2 गुणांसह गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.