IPL 2023 Opening Ceremony:  आयपीएल 2023 सुरू होण्यास आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या 31 मार्च रोजी आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जाएंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार असून अनेक सेलिब्रेटी थिरकणार आहेत. 


कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये होम आणि अवे या फॉरमॅटमध्ये स्पर्धा होणार आहे. आयपीएलचा सामना सुरू होण्यापूर्वी नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात हजेरी लावणाऱ्या सेलिब्रेटींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. 


हे सेलिब्रेटी लावणार हजेरी


वृत्तानुसार, रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करू शकतात. त्याशिवाय, टायगर श्रॉफ, कतरिना कैफ आणि अरिजीत सिंह हे सेलिब्रेटी परफॉर्म करू शकतात. 


आयपीएलचे कुठे होणार लाइव्ह स्ट्रिमिंग?


तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्याशिवाय, Jio Cinema अॅपवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. IPL उद्घाटन सोहळ्याशी संबंधित अपडेट्स तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवर मिळतील. 


चेन्नईला मोठा धक्का; बेन स्टोक्स अनफिट?


इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2023 चा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेन्नईला (CSK) ला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes ) गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोसमाच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असणार नाही. ही माहिती संघाचे प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स त्रस्त होता. मात्र दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने आपण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितलं होतं. 


KKR चाहत्यांना मोठी भेट, 'नाईट क्लब' अॅप लॉन्च


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सह-मालक शाहरुख खानने एक मजेदार व्हिडीओसह 'नाईट क्लब अॅप' लॉन्च केला आहे. 'एकदम फटाफटी अॅप' अशी त्याची टॅगलाइन आहे. केकेआरची क्षणाक्षणांची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचत राहावी, यासाठी हा अॅप लाँच करण्यात आला आहे. अॅपमध्ये एक गेम झोन देखील असेल. जेथे चाहते मॅच-डे गेममध्ये भाग घेऊ शकतात. अॅपमध्ये एक मेगास्टोअर देखील समाविष्ट असेल. जेथे चाहते अधिकृत KKR शी संबंधित वस्तू खरेदी करू शकतात आणि संघासाठी त्यांचा पाठिंबा दर्शवू शकतात. नाईट क्लब अॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.