Mumbai Indians Anthem : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा यंदाचा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात होणार आहे. दरम्यान, सर्व फ्रँचायझींचे महत्त्वाचे खेळाडू आपआपल्या संघात सहभागी होऊ लागले आहेत. त्याच वेळी, आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघाचे थीम सॉंग देखील रिलीज केले आहे.


मुंबई इंडियन्सच्या या थीम साँगमध्ये संघमालक नीता अंबानी तसंच सचिन तेंडुलकर देखील दिसत आहे. या थीम साँगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही दिसले आहेत. हे थीम साँग 'ये है मुंबई मेरी जान' या बॉलिवूड हिंदी गाण्यावर आधारित आहे. MI साठी मागील आयपीएल हंगाम काही खास नव्हता. संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामात 10 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला होता, ज्यामध्ये संघाला सुरुवातीच्या 8 सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदातरी संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. त्यात आयपीएलच्या या हंगामापूर्वी, मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला होता की त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडला होता. दरम्यान जोफ्रा आर्चर या हंगामात संघाचा वेगवान गोलंदाजी आक्रमण हाताळताना दिसू शकतो. आगामी हंगामात, मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना 2 एप्रिल रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध खेळायचा आहे. सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये रोहित आणि कोहली यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.


खास आहे मुंबई इंडियन्सची यंदाची जर्सी


यंदाच्या जर्सीमध्ये विशेष एक कस्टमायझेशन ऑप्शन फॅन्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यामुळे फॅन्सना त्यांच्याा नावांसह आणि त्यांच्या पसंतीच्या नंबरसह जर्सी पर्सनलाईस करता येऊ शकते. MI शॉपवर मॅच जर्सी, ट्रेनिंग जर्सी आणि ट्रॅव्हल जर्सी तसंच इतर मर्चन्डाईजही उपलब्ध आहेत. दरम्यान या जर्सी अनावरणप्रसंगी बोलताना, मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले की, "आमच्या संघाची जर्सी ही मुंबई इंडियन्सच्या लोकभावनेचे प्रतिबिंब आहे." वानखडे स्टेडियमवरील घरगुती खेळांसाठी तिकीट विक्री देखील पूर्व नोंदणीद्वारे आणि MI सदस्यांसाठी सुरु झाली आहे. चाहत्यांसाठी तिकिटे 14 मार्च 2023 रोजी उघडतील. मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 8 एप्रिल 2023 रोजी त्यांचा पहिला होम गेम खेळेल, चाहते bookmyshow.com वर तिकिटे बुक करु शकतात.


हे देखील वाचा-