WPL 2023 :

  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये हा सामना होणार आहे. हा प्लेऑफ दोन्ही संघांसाठी करो या मरो असाच असणार आहे. एलिमिनेटर जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. जिथे त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीचा संघ प्रथम स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या (MI vs UPW) महिला संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या आजच्या सामन्यातील संभाव्य प्लेइंग-11, खेळपट्टीचा अहवाल, हवामान अहवाल आणि एलिमिनेटर सामन्याचे थेट प्रसारण याबद्दल जाणून घेऊ...


पिच रिपोर्ट काय म्हणतोय?


डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील प्लेऑफ सामना रंगणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. दुसऱ्या डावात फिरकीपटू प्रभावी ठरतात. येथे 165 धावांची धावसंख्या आव्हानात्मक असेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल.


कसा आहे हवामानाचा अहवाल?


मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. सामन्यादरम्यान काही ढग असतील पण बहुतेक आकाश निरभ्र असेल. 40 षटकांचा कोटा असलेला सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल.


मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचे संभाव्य प्लेईंग 11


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग-11: हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया, सायका इशाक, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, नाटे सिव्हर ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, इस्सी वोंग.


यूपी वॉरियर्सचे संभाव्य प्लेईंग-11: एलिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोप्पधंडी यशश्री, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी.


सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-