MI Nehal Wadhera Profile : पदार्पणाच्या सामन्यातच मुंबईच्या 22 वर्षीय नेहाल वढेरा याने सर्वांची मने जिंकली. नेहाल वढेरा याने आरसीबीविरोधात 101 मीटरचा गगनचुंबी षटकार लगावला. हा चेंडू बेंगलोरच्या स्टेडिअमवर गेला. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर नेहाल वढेरा याने लागोपाठ दोन षटकार लगावले. त्यामधील एक चेंडू  स्टेडिअवर बाहेर गेला. वढेरा याने पदार्पणाच्या सामन्यात 13 चेंडूत 21 धावांची प्रभावी खेळी केली. या खेळीदरम्यान नेहालची चर्चा सुरु झाली. 


एम. चिन्नास्वामी स्टेडियम मुंबईच्या नेहाल वढेरा याने सर्वांचे लक्ष वेधले. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, टीम डेविड यासारखे बिग हिटर फ्लॉप ठरले. अशात नेहाल वढेरा याने फटकेबाजी केली. 48 धावांत मुंबईने चार विकेट गमावल्यानंतर नेहाल मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याने 21 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीनंतर नेहाल सोशल मीडियावर चर्चेत आला. 


101 मीटरचा षटकार - 


नेहाल वढेरा याने आज मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर नेहालने तिलक वर्मासोबत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा याने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकारांचा समावेश होता. कर्ण शर्माला मारलेला षटकार 101 मीटर लांब होता. तो 2023 मध्ये सर्वात दूर षटकार मारणारा खेळाडू झालाय. नेहाल वर्माने 14 व्या षटकारतील तिसऱ्या चेंडूवर मिड विकेटवर 101 मीटर लांब षटकार मारला. 






नेहाल वढेराची छोटेखानी खेळी - 


युवा नेहाल वढेरा यांनी 21 धावांची ताबोडतोड खेळी केली. नेहाल वढेरा याने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर नेहाल वढेरा याने दोन षटकार आणि एका चौकारासह मुंबईची धावसंख्या वाढवली. पहिल्याच सामन्यात नेहालने आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवले. दबावातही नेहाल याने दमदार फलंदाजी केली. 


कोण आहे नेहाल वढेरा - 


नेहाल वढेरा मूळचा पंजाबमधील आहे. 4 सप्टेंबर 2000 मध्ये लुधियानात त्याचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला होता. त्याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. याच वर्षी त्याने पंजाबसाठी रणजीमध्ये पदार्पण केले. पंजाबसाठी त्याने पाच सामन्यात सात डावात 376 धावा केल्या. यामद्ये दोन शतकांचा समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये नेहाल याने रणजीमध्ये पंजाबसाठी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच नेहाल वढेरा याने शतकी खेळी केली होती. या सामन्यात नेहाल याने 214 धावांचा पाऊस पाडला होता. फलंदाजीसोबत नेहाल फिरकी गोलंदाजीही करतो.