Hardik Pandya On Mumbai Indians : हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ दमदार कामगिरी करत आहे. गेल्या हंगामात गुजरातने चषकावर नाव कोरले होते. तर यंदा गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय आपल्या नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केलेय. हार्दिक पांड्याकडे टीम इंडियातही मोठी जबाबदारी दिली. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने टीम इंडियाची धुरा सांभाळली. हार्दिक पांड्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई संघातून झाली होती. मुंबई आणि हार्दिक पांड्या यांचे नाते खास आहे. याबाबत हार्दिक पांड्याला विचारण्यात आले. त्यावर हार्दिक पांड्याने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.
मुंबई इंडियन्स बद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या ?
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सबद्दल मोठे वक्तव्य केलेय. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी नेहमीच खास असेल.... असे म्हटलेय. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी पहिल्या प्रेमासारखी आहे. मुंबई इंडियन्सला कधीच विसरु शकत नाही. हार्दिक पांड्याची जिओ सिनेमावर मुलाखत प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये हार्दिक पांड्याने मुंबईबद्दलचे आपले मत व्यक्त केले. त्यासोबत रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई खास असल्याचेही त्याने सांगितले. तसेच मुंबई इंडियन्ससोबतची त्याची बाँडिंग कसेय, याबाबत त्याने सांगितले.
मुंबईसाठी हार्दिकची दमदार कामगिरी -
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. मुंबईने आतापर्यंत पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाचा महत्वाचा सदस्य होता. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समुळेच फेम मिळाला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघात हार्दिक पांड्या मोठ्या कालावधीपर्यंत होता. 2015 ते 2021 या कालावधीत हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाचा सदस्य होता. या कालावधीत हार्दिक पांड्या याने अनेकदा मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईसाठी हार्दिक पांड्या याने तुफानी कामगिरी केली आहे. मुंबईच्या यशात हार्दिक पांड्याचाही मोठा वाटा आहे. आयपीएल 2022 आधी मुंबईने हार्दिक पांड्याला रिलिज केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्याला गुजरात संघाने आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिक पांड्या याला आयपीएलमध्ये मुंबईमुळे प्रसिद्धी मिळाली.