IPL 2023 Champion: चाहत्यांचा लाडका थाला म्हणजेच, महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पुन्हा एकदा 'आयपीएल चॅम्पियन' बनवलं आहे. चेन्नईनं आयपीएल 2023 चं विजेतेपद पटकावलं. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आपला पाचवा आयपीएलचा खिताब पटकावला. गुजरात आणि चेन्नई यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील CSK संघानं डकवर्थ लुईस नियमानुसार, 5 गडी राखून विजय मिळवला. या विजयात महेंद्रसिंह धोनीची वेगळीच शैली पाहायला मिळाली. धोनीनं घेतलेला गिलचा विकेट विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. 


चेन्नईचा विजय झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं कॅमेरा लेन्सवर ऑटोग्राफ दिला. त्याचा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चेन्नईचे सर्व खेळाडू मैदानात जल्लोष साजरा करत आहेत. ही सर्व क्षण ज्या कॅमेऱ्यात कैद होत आहेत. त्याच कॅमेऱ्याच्या लेन्सच्या दिशेनं धोनी चालत येतो आणि लेन्सवर ऑटोग्राफ देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 




धोनी-जाडेजाची हुशारी 


टॉस हरुन गुजरातचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला. गुजरातच्या फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली. ओपनिंगमध्ये शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहानं तुफानी फलंदाजी केली. यावेळी चेन्नईकडून एकदा नाही, तर दोनदा शुभमन गिलला जीवनदान मिळालं. त्यानंतर गिल चेन्नईच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला होता. गिलनं केवळ 19 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या होत्या. त्यावेळी गुजरातचा स्कोअर एकही विकेट न गमावता 6.5 ओव्हर्समध्ये 67 धावांवर होता. 


इनिंगची 7वी ओवह स्पिनर रवींद्र जाडेजा टाकत होता आणि विकेटच्या मागे धोनी विकेटकिपिंग करत होता. जाडेजाच्या ओव्हरचा सहावा चेंडू टोलवण्यासाठी गिल थोडा पुढे आला, पण शॉर्ट चुकला आणि मग काय? स्टंपच्या मागे उभ्या असलेल्या धोनीनं हुशारी दाखवत गिलला स्टंप आऊट केलं. धोनीनं अचूक वेळ साधत संधीचा फायदा घेतला. शुभमन गिलचा विकेट चेन्नईसाठी खूप महत्त्वाचा ठरला. 


जाडेजाचा बेस्ट फिनिश


धोनीनंतर स्टार फिनिशर रवींद्र जाडेजा सातव्या क्रमांकावर आला. शेवटच्या 2 चेंडूंवर संपूर्ण खेळ पलटवणारा जाडेजा खर्‍या अर्थानं सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान, हा सामना शेवटच्या षटकात खूपच रंगतदार वळणावर येऊन ठेपला होता. शेवटच्या षटकात चेन्नई आणि गुजरातच्या चाहत्यांनी श्वास रोखला होता. चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती आणि स्ट्राईकवर होता, स्टार फिनिशर सर जाडेजा. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या चेंडूवर जाडेजानं सर्वात आधी षटकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूनवर विजयी चौकार लगावत जाडेजानं बेस्ट फिनिश केलं. जाडेजानं 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 CSK vs GT Final: हुशार धोनी, फिनिशर जाडेजा... 'या' 5 कारणांमुळेच चेन्नईनं पटकावला आयपीएलचा खिताब