MI vs SRH LIVE Score : मुंबई प्लेऑफचं तिकीट मिळवणार? वानखेडेवर हैदराबाद विरोधात जंगी सामना; पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

IPL 2023 MI vs SRH LIVE Score : मुंबई प्लेऑफचं तिकीट मिळवणार? वानखेडेवर हैदराबाद विरोधात जंगी सामना; पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 May 2023 07:21 PM
मुंबईचा आठ विकेटने विजय

 


मुंबईचा हैदराबादवर आठ विकेटने विजय... कॅमरुन ग्रीनचे शतक

कॅमरुन ग्रीनचे वादळी शतक

कॅमरुन ग्रीनचे वादळी शतक.. 46 चेंडूत झळकावले शतक

मुंबईला दुसरा धक्का

रोहित शर्मा अर्धशतकानंतर बाद झालाय... नितीश रेड्डीचा जबराट झेल

चिन्नस्वामी स्टेडिअमवर पावसाची हजेरी

रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीनची अर्धशतकी खेळी

मुंबई एक बाद 132 धावा

मुंबईला पहिला धक्का

ईशान किशन 14 धावांवर बाद झालाय. भुवनेश्वर कुमारने घेतली विकेट

आकाश मधवालचा भेदक मारा - 

मुंबईकडून युवा आकाश मधवाल याने भेदक मारा केला. आकाश याने 4 षटकात 4 विकेट घेतल्या. यामध्ये दोन्ही सलामी फलंदाजांचा समावेश आहे. त्याशिवाय हेनरिक क्लासेन आणि हॅरी ब्रूक या दोन्ही विस्फोटक सलामी फलंदाजांचाही समावेश आहे. ख्रिस जॉर्डन याला एक विकेट मिळाली. या दोन गोलंदाजांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

हैदराबादची 200 धावांपर्यंत मजल

हैदराबादची 200 धावांपर्यंत मजल

मधवालचा भेदक मारा

आकाश मधवाल याने हैदराबदाच्या फलंदाजांचा समाचार घेतला. क्लासेन याच्यानंतर हॅरी ब्रूक यालाही तंबूत धाडले.. 

चौथा धक्का

हेनरिक क्लासेन मोक्याच्या क्षणी बाद झालाय.. आकाश मधवाल याने घेतली विकेट

हैदराबादला तिसरा धक्का

हैदराबादला तिसरा धक्का बसलाय.. ग्लेन फिलिप एका धावेवर बाद झालाय.

हैदराबादला दुसरा धक्का

मयांक अग्रवाल झेलबाद झालाय... आकाश मधवाल 83 धावांवर बाद झाला.. 

अखेर विकेट पडली

आकाश मधवाल याने हैदराबादला दिला पहिला धक्का... विव्रांत अर्धशतकानंतर बाद झाला... 140 धावांवर हैदराबादला पहिला धक्का

मयांक अग्रवालचे वादळी अर्धशतक

मयांक अग्रवाल याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक झळकावले... 

हैदराबादची वादळी सुरुवात

हैदराबादच्या सलामी फलंदाजांनी शंभर धावांची भागिदारी केली.

हैदराबादची वादळी सुरुवात

मयांक अग्रवाल आणि विवरांत यांनी दमदार सुरुवात केली  आहे. दोघांनी 8 षटकात 74 धावांची भागिदारी केली

MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबईने 20 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई संघाने आजचा सामना जिंकल्यास त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.

SRH Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग 11

सनरायझर्स हैदराबाद (SRH) :


मयंक अग्रवाल, विव्रांत शर्मा, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, हॅरी ब्रूक, नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलीप, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

MI Playing 11 : मुंबई इंडियन्स प्लेईंग 11

मुंबई इंडियन्स (MI) :


रोहित शर्मा, इशान किशन, सुर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, कॅमरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश माधवाल.

MI vs SRH, IPL 2023 LIVE Score : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

MI vs SRH, IPL 2023 LIVE Score : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

MI vs SRH LIVE Score : थोड्याच वेळात नाणेफेक

MI vs SRH LIVE Score : थोड्याच वेळात नाणेफेक होईल

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. 

MI vs SRH LIVE Score : मुंबईची 'पलटन' विरुद्ध हैदराबाद 

मुंबई संघ आज शेवटच्या लीग सामन्यासाठी होमग्राऊंड वानखेडेवर परतला आहे. सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा सारखे खेळाडू खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पाच वेळा चॅम्पियन मुंबई पलटनची विजयाची अपेक्षा कायम आहे. पण मुंबई संघाची गोलंदाजीचा सध्या चिंतेची बाब आहे. याउलट, सनरायझर्स हैदराबाद संघाचीही चालू हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ सध्या आयपीएल गुणतालिकेत तळाशी दहाव्या क्रमांकावर आहे.

MI vs SRH, IPL Playoffs Race : प्लेऑफच्या स्पर्धेत मुंबईपेक्षा आरसीबीचं पारड

मुंबई संघाचा पहिलाच सामना असल्याने मुंबईने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 80 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला किंवा 11.5 षटकांत पाठलाग केला तरच त्यांचा नेट रनरेट वाढेल. बंगळुरूच्या सध्याच्या नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. बंगळुरू संघाने गुजरातवर दोन-तीन धावांनी जिंकला तर मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल आणि आरसीबी पात्र ठरेल. त्यामुळे प्लेऑफच्या स्पर्धेत आरसीबीचं पारड जड आहे.

MI vs SRH IPL 2023 : मुंबईची पलटन वानखेडेवर खेळण्यासाठी सज्ज

मुंबई संघाने आतापर्यंत 186, 213 आणि 200 च्या एकूण धावसंख्येचा पाठलाग करताना घरच्या मैदानावरली सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. मुंबईचे फलंदाज विशेषतः सूर्यकुमार यादवची वानखेडेवर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आहे.

MI vs SRH LIVE Score : मुंबईला हैदराबादचं आव्हान

मुंबई इंडियन्सचा लखनौ विरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात पराभव झाला. त्यामुळे मुंबईला आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकावा लागेल. मुंबईसाठी चांगली बातमी म्हणजे आज मुंबई त्यांच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर परतले आहेत. होमग्राऊंडवर शेवटचा सामना जिंकण्यासाठी मुंबईची पलटन सज्ज झाली आहे.

MI Playoff Scenario : आरसीबीचं पारडं जड, मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी नेमकं समीकरण काय?

MI & RCB IPL Playoff Scenario : आयपीएल 2023 चा शेवटचा टप्पा सुरु आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) या तीन संघांनी टॉप-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. एका स्थान शिल्लक असून यासाठी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात लढत सुरु आहे. मुंबई आणि बंगळुरू संघाला त्यांचे शेवटचे साखळी सामने जिंकून टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. तसेच, राजस्थानचा संघ बंगळुरू आणि मुंबईच्या निकालांवर अवलंबून आहे, कारण संघाने आपले सर्व साखळी सामने खेळले आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

MI vs SRH, IPL 2023 : मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना

मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

पार्श्वभूमी

IPL 2023 MI vs SRH LIVE Score : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 69 वा सामना आज मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) या दोन संघात रंगणार आहे. रविवारी, 21 मे रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH vs MI) संघ आमने-सामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई संघाला आजचा सामना जिंकणं फार आवश्यक ठरणार आहे. हैदराबाद संघाचं प्लेऑफमधी आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी हैदराबाद संघ मुंबई संघाकडून पराभवाचा वचपा काढू शकतो. या हंगामात 25 व्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला होता.


मुंबईला हैदराबादचं आव्हान


मुंबई इंडियन्सचा लखनौ विरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात पराभव झाला. त्यामुळे मुंबईला आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकावा लागेल. मुंबईसाठी चांगली बातमी म्हणजे आज मुंबई त्यांच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर परतले आहेत. होमग्राऊंडवर शेवटचा सामना जिंकण्यासाठी मुंबईची पलटन सज्ज झाली आहे.


मुंबईची पलटन वानखेडेवर खेळण्यासाठी सज्ज


मुंबई संघाने आतापर्यंत 186, 213 आणि 200 च्या एकूण धावसंख्येचा पाठलाग करताना घरच्या मैदानावरली सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. मुंबईचे फलंदाज विशेषतः सूर्यकुमार यादवची वानखेडेवर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आहे.


सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. परिणामी, ऑरेंज आर्मीने यंदाच्या मोसमात तेरापैकी नऊ सामने गमावले. काही खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार आणि हेनरिक क्लासेनचे शतक हे सर्वात प्रमुख आहेत. 


MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबईने 20 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई संघाने आजचा सामना जिंकल्यास त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.