Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: महायुतीला 288 जागांपैकी 232 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यामध्ये भाजप 135, शिवसेना शिंदे गट 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 81 जागा लढल्या. यामधून 57 जागांवर एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा विजय झाला.  विधानसभेत मिळालेल्या या यशानंतर शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 

शिवसेना कार्यकारणी बैठकीत मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना सर्वांधिकार-

शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.

एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल-

अक्कलकुआ- आमश्या फलजी पाडवी- विजयीसाक्री- मंजुळाताई तुळशीराम गावित- विजयीपाचोरा- किशोर (अप्पा) धनसिंग पाटील- विजयीमुक्ताईनगर- चंद्रकांत निंबा पाटील- विजयीबुलढाणा- संजय रामभाऊ गायकवाड- विजयीरिसोड- भावना पुंडलीकराव गवळी- पराभूतदर्यापूर- अभिजित आनंदराव अडसूळ- पराभूतरामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल- विजयभंडारा- नरेंद्र भोजराज भोंडेकर- विजयदिग्रस- संजय दुलीचंद राठोड- विजयहदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर- विजयीनांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर-  विजयीकळमनुरी- संतोष लक्ष्मणराव बांगर- विजयीछत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय पांडुरंग शिरसाट- विजयीपैठण- विलास संदिपान भुमरे- विजयीवैजापूर- रमेश नानासाहेब बोरनारे- विजयीनांदगाव- सुहास द्वारकानाथ कांदे- विजयीमालेगाव बाह्य- दादाजी दगडूजी भुसे- विजयीजालना- अर्जुन खोतकर- विजयीदेवलाली- डॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव- पराभूतपालघर- राजेंद्र धेड्या गावित- विजयीबोईसर- विलास सुकुर तरे- विजयीअंबरनाथ- बालाजी प्रल्हाद किणीकर-विजयीकल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे- विजयीओवळा – माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक- विजयीकोपरी – पाचपाखडी- एकनाथ संभाजी शिंदे- विजयीमागाठाणे- प्रकाश राजाराम सुर्वे- विजयीविक्रोळी- सुवर्णा सहदेव करंजे- पराभूतभांडुप पश्चिम- अशोक धर्मराज पाटील- विजयीजोगेश्वरी पूर्व- मनिषा रविंद्र वायकर- पराभूतदिंडोशी- संजय ब्रिजकिशोर निरुपम- पराभूतअंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल- विजयीचांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे- विजयीमानखुर्द शिवाजीनगर- सुरेश पाटील- पराभूतचेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते- विजयीकुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर (अजा)- विजयीधारावी- राजेश खंदारे- पराभूतमाहीम- सदा (सदानंद) शंकर सरवणकर- पराभूतवरळी- मिलिंद मुरली देवरा- पराभूतभायखळा- यामिनी यशवंत जाधव- पराभूतमुंबादेवी- शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)- पराभूतकर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे- विजयीअलिबाग- महेंद्र हरी दळवी- विजयीमहाड- भरतशेठ मारुती गोगावले- विजयीपुरंदर- विजय सोपानराव शिवतारे- विजयीसंगमनेर- अमोल धोंडीबा खताळ- विजयीश्रीरामपुर- भाऊसाहेब मल्हारी कांबळे- पराभूतनेवासा- विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील- विजयीउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले- पराभूतधाराशिव- अजित बाप्पासाहेब पिंगळे- पराभूतपरांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत- विजयकरमाळा- दिग्विजय बागल- पराभूतबार्शी- राजेंद्र राऊत- पराभूतसांगोला- शहाजी बापू राजाराम पाटील- पराभूतकोरेगांव- महेश संभाजीराजे शिंदे- विजयीपाटण- शंभूराज शिवाजीराव देसाई- विजयीदापोली- योगेश रामदास कदम- विजयीगुहागर- राजेश रामचंद्र बेंडल- पराभूतरत्नागिरी- उदय रविंद्र सामंत- विजयीराजापूर- किरण रविंद्र सामंत- विजयीकुडाळ- निलेश नारायण राणे- विजयीसावंतवाडी- दीपक वसंतराव केसरकर- विजयीराधानगरी- प्रकाश आनंदराव आबिटकर- विजयीकरवीर- चंद्रदिप शशिकांत नरके- विजयीकोल्हापुर उत्तर- राजेश विनायक क्षिरसागर- विजयीखानापूर- सुहास अनिल बाबर- विजयीहातकंगणले- (सहयोगी पक्ष) अशोक माने-  विजयीशिरोळ(सहयोगी पक्ष)- राजेंद्र येड्रावकर- विजयी

संबंधित बातमी:

Eknath Shinde Shiv sena All Candidate List: एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल, एका क्लिकवर; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा पराभव