MI vs RCB, IPL 2023 : आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मध्ये आज विराट कोहली आणि रोहित शर्मां यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएल 2023 (IPL 2023) साठी जोरदार तयारी केली आहे. सरावादरम्यान विराट कोहलीने तुफान फटकेबाजी केली. कोहलीचे षटकार पाहून संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही चकित झाला.


सरावावेळी कोहलीची फटकेबाजी


आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर संघाच्या तयारीचा आणि सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डू प्लेसिसची मुलाखत सुरु होती, त्यावेळी कोहली सराव करत होता. यावेळी कोहलीने षटकार ठोकला आणि हे पाहून डू प्लेसिसही दंग झाला. व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत. 


पाहा व्हिडीओ : कोहलीचा षटकार पाहून कर्णधार डू प्लेसिसही चकित







आयपीएलमध्ये विराटच्या सर्वाधिक धावा


विराट कोहली हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक 6624 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये पाच शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीची सर्वाधिक धावसंख्या 113 धावा आहे. याशिवाय आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. आयपीएल 2016 मध्ये त्याने दमदार फलंदाजी करताना सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. त्याच्या या विक्रमाच्या आसपास सध्या एकही फलंदाज नाही.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेईंग 11


डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करण शर्मा, रीस टोपली, मोहम्मद सिराज.


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्शद खान, जेसन बेहनडॉर्फ.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs MI : कोहली की रोहित कोण मारणार बाजी? मुंबईविरोधात कशी असेल बंगळुरुची प्लेईंग 11, खेळपट्टीची स्थिती जाणून घ्या...