IPL 2023 Match 37, RR vs CSK Match Prediction : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये (CSK vs RR Match Preview) लढत पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 37 वा सामना आज, 27 एप्रिलला राजस्थानच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून संघ अव्वल स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर राजस्थान संघ गेल्या सामन्यांनतर पहिल्या स्थानवरून घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा पहिलं स्थान काबीज करण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.


RR vs CSK, IPL 2023 Match 37 : चेन्नई विरुद्ध राजस्थान


जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात कोलकाताववर विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.


CSK vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.


RR vs CSK, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


राजस्थान (RR) आणि चेन्नई (CSK) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : सलग 4 सामन्यांतील पराभवानंतर कोलकाताचा पहिला विजय, आरसीबीवर मात; गुणतालिकेची स्थिती काय? जाणून घ्या