Lucknow Super Giants : आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्च ते 28 मे या दरम्यान रंगणार आहे. सर्व दहा संघांनी आयपीएलची तयारी सुरुवात केली आहे. राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ संघानेही जोरदार तयारी सुरुवात केली आहे. आज लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी नवीन जर्सी लाँच केली आहे. लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका, बीसीसीआय सचिव जय शाह, मेंटॉर गौतम गंभीर आणि कर्णधार केएल राहुल यांच्या उपस्थितीत नवी जर्सी लाँच करण्यात आले. या कार्यक्रमावेळी दीपक हुडा आणि जयदेव उनादकट उपस्थित होते.
लखनौ संघाच्या या जर्सीचा रंग जुन्या जर्सीप्रमाणेच वेगळा आहे. लखनौ संघाची यंदाची जर्सी निळ्या रंगाची आहे. नारंगी आणि हिरव्या रंगाच्या यावर पट्ट्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाने सोशल मीडियावरुन नव्या जर्सीचे फोटो पोस्ट केले आहेत. यावर त्यांनी जर्सीबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. LSG च्या माहितीनुसार, जर्सीचा निळा रंग संघाच्या लोगोपासून प्रेरित आहे. भारतीय संघाची जर्सीही निळ्या रंगाची आहे.
गेल्या वर्षी कशी होती लखनौची कामगिरी
गेल्यावर्षी लखनौ संघाने दमदार प्रदर्शन केले होते. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. लखनौ संघ पहिल्याच वर्षी प्लेऑफसाठी क्वालिफाय केले होते. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने दमदार कामगिरी केली होती. यंदाही राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास संघाच्या मालकांनी व्यक्त केला आहे.
आयपीएल 2023 मध्ये 74 सामने
आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहेत. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंघणार आहे. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत.
IPL 2023 Groups:
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.