Shubman Gill IPL Record : गुजरताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कोलकात्याविरोधात गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार केला. गिल याने हा पराक्रम 74 व्या डावात केला. शुभमन गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार करत मोठा विक्रम नावावर केलाय. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही न जमलेला कारनामा गिलने केला आहे. शुभमन गिल याने 74 व्या डावात दोन हजार धावांचा पल्ला पार केलाय.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार करणाऱ्या फलंदाजात केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. राहुलयाने अवघ्या 60 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर याने 63 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंत याने 64 आणि गौतम गंभीर याने 69 डावात दोन हजार धावांचा पल्ला पार गाठलाय. सुरेश रैना याला दोन हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 69 डावांची वाट पाहावी लागली होती. विरेंद्र सेहवाग याने 70 डावात हा कारनामा केलाय.
आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी (डाव)-
केएल राहुल 60
सचिन तेंडुलकर 63
ऋषभ पंत 64
गौतम गंभीर 68
सुरेश रैना 69
विरेंद्र सेहवान 70
अजिंक्य राहणे 71
शिखर धवन 74
शुभमन गिल 74
शुभमन गिल याने 74 डावात दोन हजार धावांचा पल्ला गाठत.. दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलेच. त्याशिवाय आयपीएलमध्ये 200 चौकार लगावण्याचा करिश्माही त्याने केला. त्याशिवाय आयपीएलमध्ये 50 षटकार लगावण्याचा कारनामा गिल याने आज केलाय.
आजच्या सामन्यात गिलची कामगिरी कशी -
कोलकाताविरोधात शुभमन गिल याने संयमी फलंदाजी केली. गिल याने 31 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. शुभमन गिल याने वृद्धीमान साहा याच्यासोबत 33 धावांची सलामी दिली. त्यानंतर साई सुदर्शन याच्यासोबत दुसऱ्याविकोटसाठी 67 धावांची भागिदारी करत गुजरातच्या डावाला आकार दिला.