KKR New Jersey : आयपीएल  2023 चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यापूर्व कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर)  आपली नवी कोरी जर्सी लाँच केली आहे. दोन वेळच्या आयपीएल विजेत्या केकेआरने रविवारी जर्सीचे अनावरण केलेय. जर्सी लाँचच्या कार्यक्रमाला अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याच्यासह रिंकू सिंह आणि वेंकटेश अय्यर यासारखे युवा खेळाडू उपस्थित होते. केकेआरने जर्सी लाँचचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

Continues below advertisement


केकेआरने इन्स्टाग्रामवर आपली नवी कोरी जर्सी लाँच केली. जांभळा आणि सोनेरी रंगामध्ये केकेआरची जर्सी उठून दिसत आहे. रसेल, रिंकू सिंह आणि वेंकटेश अय्यर या जर्सीसोबत दिसत आहे. 


पाहा कशी आहे केकेआरची नवीकोरी जर्सी -






 
कोलकाता संघाचा पहिला सामना एक एप्रिल रोजी पंजाबविरोधात मोहाली स्टेडिअमवर रंगणार आहे. तर सहा एप्रिल रोजी आरसीबीबरोबर कोलकात्यामध्ये दोन हात करणार आहे.  यंदा आयपीएलच्या संघात आठ विदेशी खेळाडूसह एकूण 22 खेळाडू आहे.  दरम्यान, केकेआर संघाला गतवर्षी प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नव्हती. केकेआरला 14 सामन्यात सहा विजय मिळवाले. 12 गुणांसह केकेआरचा संघ सातव्या क्रमांकावर होता. 







अय्यर दुखापतग्रस्त, कॅप्टनला पर्याय कोण?
अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे पुढील काही काळ मैदानापासून दूर राहणार असल्याने केकेआर संघाला आता हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे, तिथे त्यांना श्रेयस अय्यरच्या जागी बदली खेळाडू देखील निवडावा लागेल. यासाठी तीन नाव समोर येत आहेत. ज्यात जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन या जबाबदारीसाठी सर्वात योग्य खेळाडू ठरू शकतो. तसंच 2012 च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग असलेला सुनील नारायण संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक चांगला पर्याय आहे. सुनीलला इतर खेळाडूंपेक्षा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही जास्त आहे आणि तो KKR च्या दुसऱ्या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघांचाही एक भाग आहे. तसंच केकेआरकडून शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच हंगाम असेल, ज्यामध्ये भारतीय खेळाडू असल्याने तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडू शकतो.